महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाद्वारे (एमयूएचएस) वैद्यकीय शिक्षण मराठीतून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या वर्षाच्या ‘एमबीबीएस’ची पुस्तके वर्षभरात उपलब्ध होतील आणि पुढील वर्षापासून विद्यार्थी मराठीतून परीक्षा देऊ शकतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा
पुस्तके तयार करताना वैद्यकीय संज्ञा इंग्रजीमध्येच, परंतु लिपी देवनागरी असेल, असेही सांगण्यात आले आहे. वेगवेगळ्या विविध शंका-कुशंकांबरोबरच प्रकारची टीका-टिपण्णी केली जात असली तरी, नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून (एमयूएचएस) वैद्यकीय शिक्षण मराठीतून देण्याच्या हेतूने वैद्यकीय अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून आणण्यासाठी विविध प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
याच प्रयत्नांचा भाग म्हणून येत्या वर्षभरात ‘एमबीबीएस’च्या पहिल्या वर्षाची पुस्तके उपलब्ध करण्यात येणार आहेत आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना मराठीतून परीक्षा देता येणार आहे, असे विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मातृभाषेतून म्हणजेच मराठीतून वैद्यकीय शिक्षणासह अभियांत्रिकी व इतर तांत्रिक अभ्यासक्रमांची पुस्तके उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मागेच झाला.
महाराष्ट्र राज्याच्या आधी मध्य प्रदेश सरकारने या निर्णयाची अंमलबजावणीही केली आहे. त्यापाठोपाठ छत्तीसगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांनीही या संदर्भातील निर्णय जाहीर केला आहे. या दृष्टीने विविध राज्यांमध्ये हा उपक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्र सरकारनेही या संबंधीचा निर्णय मागेच जाहीर करुन मराठीतून वैद्यकीय तसेच दंत शिक्षण देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचे समोर येत आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE