सरकारकडून मुलींच्या शिक्षणासाठी ५०००० रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यासाठी एक मोठी आणि चांगली योजना सुरु करण्यात आलेली आहे. ती योजना म्हणजे मुख्यमंत्री राजश्री योजना ही आहे. मुलींना सशक्त आणि आत्मनिर्भर करण्याची गरज आहे तेव्हाच मुली स्वतःचे रक्षण करू शकतील. त्यासाठी गरज आहे चांगल्या शिक्षणाची तेव्हाच मुलींचा सर्वांगीण विकास होईल. या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील , योजनेचा लाभ कसा असेल आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा आहे. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या या योजनेबद्दल माहिती खाली दिलेली आहे.
मुख्यमंत्री राजश्री योजना ही योजना प्रथम राजस्थान सरकारने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत मुलगी जन्माला आल्या पासून ते मुलगी बारावी उत्तीर्ण होईपर्यंत सहा हफ्त्या मध्ये याचा लाभ दिला जाणार आहे. लाभाची संपूर्ण रक्कम ५०००० रुपये इतकी आहे. ज्याचा लाभ घेऊन मुलींना शिक्षण घेण्याकरिता पाठबळ मिळेल आणि मुली चांगले शिक्षण घेऊन स्वावलंबी बनू शकतील.ज्या मुली 1 जून 2016 नंतर जन्मल्या त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेसाठी लागणारी पात्रता
- योजनेच्या लाभासाठी पात्र होण्याकरिता मुलीचा जन्म हा 1 जून 2016 नंतर झाला असेल तरच तिला योजनेचा लाभ घेता येईल
- मुलीचा जन्म हा सरकारी दवाखान्यात होणे बंधनकारक आहे. तसेच जर का सरकारमान्य दवाखाना असेल तरी सुद्धा योजनेचा लाभ मिळू शकेल
- मुलगी हि राज्यसरकारच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असणे गरजेचे आहे. जर इतर प्रायव्हेट शाळेत शिक्षण घेत असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही.
- एक कुटुंबातील केवळ दोन मुलींनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे
- मुलीच्या पालकांचे आधारकार्ड
- प्रसूतीच्या काळात आईचा मृत्यू झाला असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- मुलीचे आधार कार्ड
- जन्माचा दाखला
- आरोग्य कार्ड
- जर पालकांना दोन अपत्य असतील तर स्वयंघोषणापत्र
- शाळेत प्रवेश घेतल्याचा दाखला
- बँकेचे खातेबुक
- चालू मोबाईल नंबर
- पासपोर्ट फोटो
या योजनेसाठी अर्ज कसा करायचा
- कागद्पत्रे तयार करून ठेवावीत
- सरकारच्या अधिकृत साइट जनकल्याण पोर्टल वरती जावे
- योजनेचे नाव दिसेल त्यावर क्लिक करावे
- तुमच्या पुढे ऑनलाईन अर्ज करा असा पर्याय येईल
- त्यावर क्लीक करा आणि आधार कार्ड टाकून नंबर रजिस्ट्रेशन करून घ्या.
- मग पुन्हा लॉग इन करून राजश्री योजनेचा अर्ज भरण्यास सुरुवात करा
- त्या अर्जामध्ये मुलीच्या जन्म दाखला नंबर, भामाशाह कार्ड चा नंबर, आधार कार्ड नंबर यासारखी माहिती भरावी लागणार आहे.
- नंतर कागदपत्रे अपलोड सुद्धा करावी लागतील.
- भरलेला अर्ज पूर्ण एकदा तपासावा आणि जे माहिती चुकीची भरण्यात आली असेल ती भर पुन्हा भरा. सर्व चेक झाल्यावर तुम्ही हा अर्ज सबमिट करू शकता.
अशा पद्धतीने मुख्यमंत्री राजश्री योजनेचा अर्ज मराठी मधून भरून तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

