JOIN Telegram
Saturday , 9 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सरकारची नवी योजना जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये !

सरकारची नवी योजना जेष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपये !

Mukhyamantri Vayoshri Yojana : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्य सरकारने सामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. ज्या मधून सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे. सरकारच्या लाडकी बहीण योजनेची सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे. अशातच आता सरकारने आणखी एक योजना आणलेली आहे. या योजनेचे नाव मुख्यमंत्री वयोश्री योजना अशी आहे. नुकतेच सरकारने या योजनेची घोषणा केलेली आहे.

सरकारने केलेल्या घोषणेनुसार या योजनेत आता 65 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आहे. त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा केली जाणार आहेत. परंतु आता या योजनेचा लाभ नक्की कोणाला होणार आहे? यात पात्र कोण ठरणार आहे? आणि कोण कोणती कागदपत्रे लागतील?याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊया.

ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा काम करता येत नाही. अनेक लोकांनी त्यांच्या निवृत्तीनंतर आयुष्याची आर्थिक तयारी केलेली असते. परंतु अनेक लोकांनी ही तयारी केलेली नसते. त्यामुळे त्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्या येतात. तसेच वयोमानानुसार येणारे आजार देखील असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर उपचार करण्यासाठी योगाचार्य केंद्र उपलब्ध करणे मानसिक संतुलन ठेवण्यासाठी मन स्वास्थ्य केंद्र यांचा प्रशिक्षण देण्यासाठी आता पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत वृद्ध असणाऱ्या लाभार्थ्यांना त्यांची शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार साधने उपकरणे आणि चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वर्कर, कमोड खुर्ची, सर्वाइकल कॉलर यांसारख्या गोष्टी खरेदी करता येणार आहेत.

योजनेसाठी कागदपत्रे
या योजनेसाठी तुम्हाला आधारकार्ड/ मतदान कार्ड, पासपोर्ट आकाराचे 2 फोटो, राष्ट्रीयकृत बँकेच्या बँक पासबूकची झेरॉक्स, स्वयं-घोषणाफत्र, शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे.

योजनेचे निकष
या योजनेत पात्र होण्यासाठी 31 डिसेंबर 2024 अखेर उमेदवाराचे वय 65 पूर्ण असणे गरजेचे आहे.
उमेदवाराच्या आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्ड नसल्यास स्वतंत्र ओळखपत्र कागदपत्र असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्यक कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापण निवृत्ती वेतन योजनेचे अंतर्गत अंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योनजे अंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत असावे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *