वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मुंबई विद्यापीठाच्या विधी परीक्षा लांबणीवर ; वाचा सविस्तर

मुंबई विद्यापीठाच्या Law च्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. LLB three year course ची First Semester Exam लांबणीवर आहे. या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

Mumbai University LLB first sem exam Postponed 2025

मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) एलएलबीच्या तीन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या (Three year LLB course) प्रथम सत्र परीक्षा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलल्या (First semester exams postponed until February) आहेत. या परीक्षा डिसेंबरच्या मध्यावर घेतल्या जातात. विद्यापीठाने सप्टेंबरमध्ये जाहीर केलेल्या परीक्षा अचानक दीड महिने पुढे ढकलल्याने विद्यार्थी आणि महाविद्यालये संभ्रमात पडले आहेत.

शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण होत आला असताना आता विद्यार्थ्यांनी पुढील दीड महिने काय करायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या संचालिका पूजा रौंदळ यांनी दि. ८ सप्टेंबरला काढलेल्या पत्रकानुसार प्रथम वर्षाच्या परीक्षा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचे जाहीर केले होते.

मात्र आता मुंबई विद्यापीठाच्या निर्णयानुसार ३ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू केल्या जाणार आहेत. विद्यापीठाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे कॉलेजांचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. विद्यापीठाच्या सप्टेंबरमधील वेळापत्रकानुसार महाविद्यालयांनी तयारी केली होती. अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवाळीची सुट्टी रद्द केली.

विद्यापीठ शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर तात्पुरते वेळापत्रक जाहीर करते. यंदा एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमाचे प्रवेश उशिरापर्यंत चालले. त्यातून प्रथम सत्राचा अपेक्षित शैक्षणिक कालावधी पूर्ण नव्हता. त्यातून या परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे, अशी माहिती विद्यापीठाने दिली.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

Ladki Bahin Yojana new update 2025

लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना ३००० रुपये वाटप सुरु !

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिना १५०० रुपये दिले जातात. जेव्हा दोन महिन्याचे हफ्ते एकत्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *