मुंबई विद्यापीठाचा विधि विभाग आणि संलग्नीत महाविद्यालयात एलएलएम अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेशपूर्व परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यापीठाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विद्यापीठ सिनेट सदस्यांसह विद्यार्थ्यांनी केली आहे. गणेशोत्सवामुळे विद्यार्थी गावी गेल्याने त्यांना अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी किमान तीन दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मुंबई विद्यापीठाने एलएलएम प्रवेशपूर्व परीक्षेसाठी २६ ऑगस्टपासून ऑनलाइन प्रवेश अर्ज घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना ३ सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, गणेशोत्सवास २७ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे गणेश उत्साहाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी गावी गेले आहेत.
तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे कागदपत्रे उपलब्ध नाहीत. कागदपत्रे काढण्यास अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी, करण्यात येत आहे. यासह प्रवेशपूर्व परीक्षेचे अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी वाढीव तीन दिवसांची मुदत द्यावr, असी मागणी विद्यार्थी व विद्यापीठ सिनेट सदस्यांकडून करण्यात येत आहे.
विद्यापीठाकडून ही परीक्षा ऑनलाइन सेंटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज, पात्रता, नोंदणी, शुल्क आणि नियम यांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली, असल्याची माहिती विद्यापीठाकडून यापुर्वीच देण्यात आली आहे गणेशोत्सवास २७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.
त्यामुळे गणेश उत्साहाच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी गावी गेले आहेत. तसेच अनेक विद्यार्थ्यांकडे कागदपत्रे उपलब्ध नाहीत. यासह प्रवेशपूर्व परीक्षेचे अर्ज भरण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी वाढीव तीन दिवसांची मुदत द्यावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE