आरोग्य विभाग नाशिक येथे कंत्राटी पदभरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. निविदा प्रक्रियेत नियम मोडल्याचा दावा केला आहे. या संस्थेने शासकीय नियमाचे उल्लंघन केले. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आरोग्य विभागात कंत्राटी पदे भरण्याचे काम दिलेल्या संबंधित संस्थेने निविदा प्रक्रियेतील अटी आणि शर्थीचा भंग केल्याचा दावा माधवं सेनेने केला आहे. माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे हा दावा करण्यात आला असून, तत्कालीन अधिकाऱ्यांच्या संगनमताने शासनाची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी आरोग्य उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. माधवं सेनेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड यांनी आरोग्य सेवा नाशिक मंडळाच्या उपसंचालक कार्यालयातील अधिकारी डॉ. चित्ते यांना निवेदन दिले.
त्यामध्ये म्हटल्यानुसार नाशिक विभागातील सरकारी रुग्णालयांमध्ये सन २०२२ मध्ये कंत्राटी तत्वावर विविध पदे भरण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
लिपिक, परिचारिका, एक्स-रे टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, वॉर्डबॉय, शिपाई, स्टोअरकिपर, चालक, आया, रक्तपेढी सहायक अशा विविध पदांच्या एकूण ४२७जागा भरण्यात येणार होत्या. याकरिता ऑनलाइन पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेतून ज्या संस्थेकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली त्या संस्थेने निविदेतील अटी आणि शर्थीचा भंग केल्याचा दावा माधवं सेनेने केला आहे.
या प्रक्रियेत दुसऱ्या क्रमांकावरील कंपनीतील काहींना पहिल्या संस्थेत संचालक तसेच कर्मचारीदेखील दाखविण्यात आले आहे, असेही माधवं सेनेने निवेदनात म्हटले आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE