वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सुवर्णसंधी!! नाशिक महानगर पालिका अंतर्गत अग्निशमन विभागात १८६ रिक्त पदांची भरती सुरु ! असा करा अर्ज

तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी , नाशिक महापालिके मध्ये सिहंस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नोकरीभरतीप्रक्रिया सुरु झाली आहे. पहिले ११४ अभियंत्याच्या रिक्त जागेची जाहिरात प्रकाशित झाली होती . आता नाशिक महानगरपालिकेअंतर्गत अग्निशमन विभागातील ऐकूण १८६ रिक्त जागेच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे. ही भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत राबवली जाणार आहे. या भरतीसाठी इच्छुक तरुणांना १० नोव्हेंबर २०२५ पासून अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर क्लिक करा.

“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

Nashik Municipal Corporation Fire Brigade Bharti 2025

Nashik Municipal Corporation Fire Brigade Recruitment 2025 : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत नोकरभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात तांत्रिक संवर्गातील अभियंत्यांच्या ११४ रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर आता अग्निशमन विभागातील फायरमन व चालक-यंत्रचालक तथा वाहनचालकांच्या १८६ जागा भरण्यासाठी मनपाने अर्ज मागविले आहेत. याबाबतची जाहिरात बुधवारी (दि.५) प्रसिद्ध झाली टीसीएसमार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

अधिकृत संकेतस्थळhttps://nmc.gov.in/

नाशिक महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश असला तरी सद्यस्थितीत आस्थापना परिशिष्ट मात्र ‘क’ वर्गातीलच मंजूर आहे. या आस्थापना परिशिष्टाला १९९५ मध्ये मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार विविध संवर्गातील ७,७२५ पदे मंजूर आहेत. ‘ब’ वर्गानुसार १४ हजार ४०० पदांचा सुधारीत आकृतिबंध महापालिकेने शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला होता. अद्याप त्यास मंजुरी मिळू शकलेली नाही. या दरम्यान आस्थापना परिशिष्टावरील जवळपास निम्मी पदे ही दरमहा सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्तीसह विविध कारणांमुळे रिक्त झाली आहेत. यामुळे जवळपास प्रत्येक अधिकाऱ्याकडे एकापेक्षा अधिक विभागांचा, पदांचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कामांमध्ये अडचणी येत आहेत.

  • सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तांत्रिक संवर्ग तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास परवानगी.
  • अग्निशमन विभागातील रिक्त २४६ पैकी १८६ जागांसाठीच भरती होणार.
  • अग्निशमनमधील यंत्रचालक-वाहनचालक ३६, तर फायरमनचे १५० पदे भरण्यासाठीच जाहिरात प्रसिद्धीचा निर्णय.
  • दहा नोव्हेंबरपासून पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करता येणार.

या नोकरभरतीसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) सोबत करार करण्यात आला आहे. महापालिकेचा आस्थापना खर्च जवळपास ४५ टक्क्यांपर्यंत असल्यामुळे पद भरतीस मान्यता मिळत नव्हती. महापालिकेने वारंवार पाठपुरावा केल्यामुळे तसेच आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आता अग्निशमन व तांत्रिक संवर्गातील पद भरतीला शासनाने आस्थापना खर्चाची अट शिथिल करीत मान्यता दिली आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

All teachers TET Exam Compulsary 2025

महत्वाची बातमी !! सर्व शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक; त्यासाठी फेरविचार याचिका नको !

सर्व शिक्षकांसाठी महत्वाची बातमी , सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषद आणि शाळांमधील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *