JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

नाशिक जिल्हा परिषदेतर्फे २२२ प्राथमिक शिक्षकांची आज पदस्थापना

While the teacher recruitment process is being implemented in the state, 222 primary teachers will be posted through counseling today by the Nashik Zilla Parishad. District Council Education Officer (Primary) Dr. District Council Education Officer (Primary) Dr. It has been done by Nitin Bachhav. The recruitment process was conducted by the Primary Education Department of the Zilla Parishad on Monday, Tuesday (March 4, 5) through the holy portal.

After verification of documents through the process, a total of 222 teachers were selected for induction. In this Zilla Parishad Bhavan Nashik UGT All Subjects (Marathi Medium) 170, UGT All Subjects (English Medium) 04, GT Math/Science 45 219 and 3 candidates submitted late documents, total 222 primary teachers will be posted. If 5 candidates do not attend the interview, 3 players will be posted after verification of documents of the candidates. In this way a total of 225 primary teachers will be posted.

राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात असतांना नाशिक जिल्हा परिषदेतर्फे आज २२२ प्राथमिक शिक्षकांची समुपदेशनाद्वारे पदस्थापना करण्यात येणार आहे. समुपदेशनासाठी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या होरायझन अकॅडमी सीबीएससी बिल्डिंग गंगापूररोड, नाशिक केबीटी इंजिनिअरिंग कॉलेज समोर, नाशिक येथे पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह सकाळी १० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. नितीन बच्छाव यांनी केले आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सोमवार, मंगळवार (दि. ४, ५ मार्च) पवित्र पोर्टल द्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.

प्रक्रियेद्वारे कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर एकूण २२२ शिक्षकांची पदस्तापनेसाठी निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद भवन नाशिक युजीटी सर्व विषय (मराठी मिडीयम) १७०, युजीटी सर्व विषय (इंग्लिश मीडियम) ०४, जीटी मॅथ/सायन्स ४५ अशा २१९ तर ३ उमेदवारांनी उशीरा कागदपत्रे सादर केल्याने एकूण २२२ प्राथमिक शिक्षकांची पदस्थापना करण्यात येणार आहे. ५ उमेदवार मुलाखतीस गैरहजर होते तर ३ खेळाडू उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पदस्थापना देण्यात येणार आहे. याप्रमाणे एकूण २२५ प्राथमिक शिक्षकांची पदस्थापना करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेने आवश्यकतेनुसार जिल्ह्यात ३२० शिक्षकांच्या जागा भरण्याबाबत पवित्र पोर्टलद्वारे शासनाला कळविले होते. मात्र शासनाने नाशिक जिल्ह्यात २३० शिक्षक पदे भरण्यास मंजुरी दिली अशी माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली. राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत ११ हजार ८५ उमेदवारांची शिक्षक म्हणून शिफारस करण्यात आली असून, २० वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक उपलब्ध होणार आहेत. राज्यात २१ हजार ६७८ जागांवर भरती प्रक्रिया सुरू होती. त्यात मुलाखतीशिवाय १६ हजार ७९९ तर, मुलाखतीसह चार हजार ८७९ पदांचा समावेश आहे. उमेदवारांचे प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण करून घेतल्यानंतर, विनामुलाखतीची शिफारस प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्याचप्रमाणे माजी सैनिक, अंशकालीन उमेदवार, खेळाडू उमेदवार या आरक्षण घटकांतील उमेदवार नसल्याने पाच हजार ७१७ पदे रिक्त राहिली आहेत.

त्यात पहिली ते पाचवीच्या इंग्रजी माध्यमाच्या एक हजार ५८५, मराठी माध्यमाच्या ८७०, ऊर्दू माध्यमाच्या ६४०, सहावी ते आठवी गटातील गणित विज्ञानाच्या दोन हजार २३८ जागांचा समावेश आहे. या पदभरतीमध्ये १:१ या प्रमाणात उमेदवार देण्यासाठी व्यवस्थापननिहाय पदे विचारात घेऊन शिफारस करण्यात आली. पवित्र पोर्टलवर अंतिम केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय; तसेच न्यायनिवाडे, सरकारी आदेश अशा सर्व बाबी विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली. शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाच्या निवड समितीकडून केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *