चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. परीक्षा, मुलाखती अशा विविध टप्प्यांतून जावं लागतं, पण अनेकदा संधी मिळणं कठीण ठरतं. अशा वेळी जर तुम्ही अजूनही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
पुण्यातील नवोदय विद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. नवोदय विद्यालय समितीच्या प्रादेशिक कार्यालय, पुणे येथे वसतिगृह अधीक्षक (Warden) आणि समुपदेशक (Counselor) या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना पुण्यातील नवोदय विद्यालयांमध्ये काम करावं लागेल. काही रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 मे 2025 आहे. यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील. निवड झालेल्या उमेदवारांना चांगल्या वेतनासह नोकरीची संधी मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत वेबसाईटवर https://navodaya.gov.in/ भेट देणे आवश्यक आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE