NCERT च्या पुस्तकांबाबत एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. NCERT चे fake बुक संपूर्ण देशभरात विकले जात आहे. बनावट पुस्तक विकणारांचें एक रॅकेट आहे. ते रॅकेट नागपुरात आहे अशी माहिती समोर आली आहे. नागपुरात एनसीईआरटी च्या बनावट पुस्तकांची विक्री करणारे रॅकेट समोर आहे. अनेक शाळातील विद्यार्थी व पालकांकडून त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांचा दर्जा एकदम खराब असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बनावट पुस्तकांची विक्री करणारे रॅकेट (Counterfeit book sales racket) हे केवळ नागपुरात नसून देशभरात याची व्याप्ती पसरली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
मागील दीड वर्षांत देशात एकट्या ‘एनसीईआरटी’ च्या ४.७१ लाख बनावट पुस्तकांचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्याहून अधिक माल प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या दप्तरात पोहोचला आहे. या प्रकरणाची चुनूक लागताच पोलिसांनी नागपुरात एनसीईआरटी’च्या बनावट पुस्तकांच्या विक्रीच्या रॅकेटचा भंडाफोड केला. बऱ्याच पालक व विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या दर्जाबाबत असमाधान व्यक्त केले. सर्वसाधारणतः दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश येथे ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांचे बनावटीकरण करण्यात येते.
काही प्रिंटिंग प्रेस मालक व शिक्षण क्षेत्रातील दलाल यात कार्यरत आहेत. कुणालाही शंका येऊ नये यासाठी ‘एनसीईआरटी’चा बनावट वॉटरमार्क असलेले पेपरदेखील काही लहान ‘मिल्स’ला हाताशी धरून तयार केले जातात. त्या पेपरचा दर्जा फारच खराब असतो व अनेकदा त्यावर छपाई झाल्यावर अक्षरे अस्पष्ट दिसतात. ठरावीक ‘लॉजिस्टिक चॅनेल्स’च्या माध्यमातून ही पुस्तके देशभरात पोहोचविली जातात.
पायरसी करणाऱ्यांसाठी एजंट्स काम करतात व ते समन्वय साधतात. मागील आठवड्यात नागपुरातील टिळक मार्गावरील कर्मवीर बुक डेपोत बनावट पुस्तके आढळली होती व तेथून ३६ विषयांची बनावट पुस्तके जप्त करण्यात आली होती. ‘एनसीईआरटी’कडे यासंदर्भात सातत्याने तक्रारी येत आहेत. या बनावट पुस्तकांमुळे एनसीईआरटी’ला मोठे आर्थिक नुकसानदेखील झाले होते.
त्यामुळे विशेष पथक तयार करून ‘एनसीईआरटी ने या विरोधात पावले उचलली आहेत. विविध राज्यांच्या पोलिस यंत्रणेसोबत एनसीईआरटी’ची ४.७१ लाख बनावट पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. मागील दीड वर्षातील ही आकडेवारी आहे. ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांचे बनावटीकरण करणाऱ्या ३० जागांवर धाडी टाकण्यात आल्या व २० कोटींहून अधिक साठा तसेच त्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE