१२वी उत्तीर्णांसाठी चांगली संधी ! केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी NDA साठी एकूण ३९४ पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केलेली आहे. आता सध्या १२ वी मध्ये शिकणारे सुद्धा अर्ज करू शकतात. या संदर्भातील अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सध्या 12वीत शिकणारे उमेदवार देखील या परीक्षेसाठी तात्पुरते अर्ज करू शकतात, परंतु त्यांनी 10 डिसेंबर 2026 पर्यंत 12वी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांची निवड त्यांचे अंतिम निकाल सादर केल्यानंतरच वैध मानली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (NDA आणि NA I), 2026 साठी अधिसूचना जारी (Notification issued) केली आहे. या परीक्षेतून NDA च्या 157 व्या अभ्यासक्रमासाठी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स विंगमध्ये (Army, Navy and Air Force wing posts) एकूण 394 पुरुष आणि महिला उमेदवारांची निवड केली जाईल. 1 जानेवारी 2027 पासून सुरू होणाऱ्या 119 व्या भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमासाठी (Indian Naval Academy Curriculum) भरती घेतली जाईल.
एनडीएच्या आर्मी शाखेसाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 10+2 पॅटर्न अंतर्गत 12वी उत्तीर्ण केलेली असावी. एनडीएच्या हवाई दल आणि नौदल शाखांसह, भारतीय नौदल अकादमी (आयएनएसी) 10+2 कॅडेट प्रवेश योजनेसाठी, उमेदवारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या विषयांसह 12वी उत्तीर्ण केलेली असावी.
UPSC कडून NDA/NA -I 2026 साठी अर्ज करण्यासाठी सामान्य आणि OBC पुरुष उमेदवारांना100 रुपये शुल्क भरावा लागणार आहे. तर SC, ST, महिला उमेदवार आणि JCO/NCO/ORS उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे. याचा अर्थ या श्रेणीतील उमेदवार मोफत अर्ज करू शकतात.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati