The country is ready to play a big role in the semiconductor sector and the days are not far when India or the sector becomes a global superpower, Prime Minister Narendra Modi expressed confidence on Wednesday. He would have spoken on the occasion of the inauguration of three semiconductor facility projects worth Rs 1.25 lakh crore in Gujarat and Assam. After Payabharani, Prime Minister Modi targeted Congress leaders. Modi said that the previous governments led by Congress failed to convert the semiconductor dreams into reality due to lack of capacity.
What is the chip useful for?
Semiconductor chip works like a brain for electronics such as cars, computers, TVs, mobiles, gadgets, speakers, trains, smart bulbs microphones, cameras etc. A chip is the most important component for automation in devices.
■ This chip made of silicon is used in many devices in ATM, healthcare, agriculture industry.
■ Intel, Samsung, Taiwan Semiconductor Manufacturing Company, Broadcom and Avidia are the leading chip manufacturers.
■ Today, China is still the world’s largest semiconductor producer. America is at the forefront of this research. Taiwan is a leader in assembly and packaging.
देश सेमीकंडक्टर क्षेत्रात मोठी भूमिका बजावण्यास सज्ज आहे आणि ते दिवस दूर नाहीत, जेव्हा भारत या क्षेत्रात जागतिक महासत्ता बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. गुजरात आणि आसाममधील १.२५ लाख कोटींच्या तीन सेमीकंडक्टर सुविधा प्रकल्पांच्या पायाभरणीप्रसंगी ते बोलत होते. पायाभरणीनंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसच्या नेतृत्वातील मागील सरकारांमध्ये क्षमता नसल्याने सेमीकंडक्टरच्या स्वप्नांना सत्यात बदलण्यात ते अपयशी ठरले, असे मोदी म्हणाले.
असे आहेत तीन प्रकल्प
- गुजरातमधील ढोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्रात (डीएसआयआर) सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सुविधा
- आसाममधील मोरीगाव येथे ‘आउटसोर्स सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट’ (ओसेंट) सुविधा आणि
- गुजरातमधील साणंद येथे ओसेंट सुविधा असे हे तीन प्रकल्प आहेत
देशाला सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र बनवण्याच्या आपल्या सरकारच्या वचनबद्धतेचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद मोदी यावेळी म्हणाले की, जेव्हा भारत ठरवतो तेव्हा ते केल्याशिवाय राहत नाही. चिप उत्पादनामुळे अनंत शक्यतांसह विकासाचे दरवाजे उघडतील. दोनच वर्षांपूर्वी, आमच्या सरकारने देशाचे सेमीकंडक्टर मिशन घोषित केले. त्यानंतर काही महिन्यांत आम्ही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आणि आज आम्ही तीन प्रकल्पांची पायाभरणी करत आहोत. सेमीकंडक्टर उत्पादनात भारत आधीच दशके मागे पडलेला आहे, परंतु यापुढे एक क्षणही गमावणार नाही, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.