New Policy to Be Implemented for Primary School Teachers with B.Ed Qualification :बी.एड पात्रता असलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी अनिवार्य ब्रिज कोर्स लागू राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) ने बी.एड पात्रता प्राप्त प्राथमिक शाळांतील शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
११ ऑगस्ट २०२३ रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, अशा शिक्षकांना आता सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स करावा लागणार आहे. हा कोर्स राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्था (NIOS) यांच्यामार्फत दिला जाणार आहे.
हा नियम फक्त प्रत्यक्ष सेवेत असलेल्या आणि न्यायालयाच्या आदेशामुळे प्रभावित झालेल्या शिक्षकांवर लागू होईल. ज्या शिक्षकांनी केवळ अर्ज केला होता किंवा निवड होऊनही प्रत्यक्ष सेवेत आले नव्हते, त्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही.
एनसीईआरटी ने नवीन अभ्यासक्रमानुसार पाचवी व आठवीसाठी अनुक्रमे ३० व ४५ दिवसांचे ब्रिज कोर्सेस तयार केले असून, याबाबत सीबीएसई ने सर्व शाळांना सूचना पाठवल्या आहेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE