वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

नवीन बातमी !! लाडक्या बहिणीसाठी विशेष आर्थिक योजना सुरु।फायदा घ्या

राज्य सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ” योजनेतून आर्थिक मदत मिळवणाऱ्या महिलांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे .  महिलांच्या आर्थिक समीक्षाकारणासाठी त्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सरकारने एक महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करायला आणि त्याची नोंदणी करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. यामुळे महिलांना बचत , कर्ज सुविधा आणि स्वयंरोजगारासाठी मदत होईल.

महिला पतसंस्था काय ? त्याची नोंदणी कशी करायची ?

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, पात्र महिलांच्या सहभागातून स्थापन होणाऱ्या या संस्थांची नोंदणी ही ८ मार्च २०१९ च्या परिपत्रकानुसार केली जाणार आहे. यात शहर, नगरपालिका, गाव व तालुका कार्यक्षेत्रानुसार सभासदसंख्या आणि भांडवल रक्कमेचे निकष ठरवण्यात आले आहेत.

Mazi Ladki Bahin Yojana new scheme for women

महानगरपालिका क्षेत्रात किमान २०००  सभासद व  ₹३० लाख भांडवल आवश्यक , तालुका  क्षेत्रात ५०० सभासद व ₹५  लाख भांडवल , गाव क्षेत्रात २५० सभासद व ₹ १ .५ लाख भांडवल  , तसेच नोंदणी करताना महिलांची अधिकृत यादी महिला व बालविकास विभागाकडून प्रमाणित करून घ्यावी लागणार आहे.

या योजनेसाठी KYC अटी लागू 

पतसंस्थेच्या नोंदणीसाठी प्रत्येक प्रवर्तकाने न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे.

१०० % KYC पूर्तता , कोणत्याही प्रकारचा सावकारी व्यवसाय नाही, सहकारी संस्थांमध्ये थकबाकीदार नाहीत, इतर सहकारी संस्थांचे संचालक नाहीत.  इत्यादी अटी लागू होणार , या अटी जर पूर्ण झाल्या नाहीत, तर संस्थेची नोंदणी थेट नाकारली जाईल. शिवाय, प्रत्येक नोंदणीकृत पतसंस्थेसाठी सहकार विभागामार्फत एक पालक अधिकारी नेमण्यात येणार आहे जो संस्थेला लेखा , कायदे , सभा व लेखापरीक्षणा संदर्भात मार्गदर्शन करेल.

सरकारच्या या निर्णयाचा महिलांना काय फायदा होणार?

सरकारच्या या निर्णयामुळे लाडकी बहीण योजनेतील महिलांना स्वतः चा पतसंस्था बिझनेस सुरु करता येणार आहे. त्यातून बचत व लघुवित्ताच्या माध्यमातून महिलांमध्ये स्वावलंबन , उद्योजकता आणि सामाजिक भक्कमपणा निर्माण होण्यास मदत होईल. कर्जसुविधा , गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाचे स्वातंत्र्य मिळेल.

तसेच, महायुती सरकारने ‘माझी लाडकी बहीण ‘ योजनेद्वारे ग्रामीण व शहरी भागातील महिलांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवली. आता त्या महिलांना स्वतः ची पतसंस्था उभारण्याची संधी देऊन, राज्य सरकारने महिलांसाठी एक धोरणात्मक व दूरदृष्टीचा टप्पा पार केला आहे.

 

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

ICAR CICR Nagpur Bharti 2025 अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

ICAR CICR Nagpur Bharti 2025 – ICAR CICR (Central Institute for Cotton Research) Nagpur announces new recruitment .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *