वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती !

छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती !

NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत छत्रपती संभाजीनगरमध्ये २२ जागांची भरती प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या पदांमध्ये आरोग्य सेवांशी संबंधित विविध पदांचा समावेश आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात काम करण्यासाठी इच्छूक असलेल्यानासाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, एएनएम, लसीकरण फील्ड मॉनिटर या पदांच्या एकूण २२ रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जरी करण्यात आली आहे. या पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ४ ऑक्टोबर २०२४ आहे. तसेच, वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी १ ऑक्टोबर २०२४ रोजी हजार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज शुल्क-
खुल्या प्रवर्गाकरीता १५० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.
मागास प्रवर्गाकरीता १०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे.
अर्ज पद्धती – ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, डेटा सेंटर, सिटी मार्व्हेल बील्डींग, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०२४
निवड प्रक्रिया – मुलाखत (वैद्यकीय अधिकारी)
मुलाखतीचा पत्ता – मुख्य इमारत महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर.
मुलाखतीची तारीख – १ ऑक्टोबर २०२४
अधिकृत वेबसाईट – https://www.aurangabadmahapalika.org/

शैक्षणिक पात्रता
अधिकारी पदासाठी एमबीबीएस यामध्ये शिक्षण पूर्ण झालेले असावे.
लॅब टेक्निशियन या पदासाठी बीएससी, डीएमएलटी यामध्ये शिक्षण पूर्ण झालेले असावे.
एएनएम या पदासाठी ए.एन.एम मध्ये शिक्षण पूर्ण झालेले असावे.
लसीकरण फील्ड मॉनिटर या पदासाठी मराठी आणि इंग्रजीमध्ये टायपिंग कौशल्यासह कोणताही पदवी असलेला उमेदवार अर्ज करू शकतो.

वेतनश्रेणी-
वैद्यकीय अधिकारी या पदासाठी ६०,००० रुपये पगार देण्यात येईल.
लॅब टेक्निशियन या पदासाठी १७,००० रुपये पगार देण्यात येईल.
एएनएम या पदासाठी १८,००० रुपये पगार देण्यात येईल.
लसीकरण फील्ड मॉनिटर या पदासाठी २०,००० रुपये पगार देण्यात येईल.

अर्ज कसा करावा?
सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ऑक्टोबर २०२४ आहे.

निवड प्रक्रिया-
वरील पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. सदर पदांकरिता मुलाखती १ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी https://chhsambhajinagarmc.org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

About Majhi Naukri

Check Also

TISS SSW – MA (Social Work) ; रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर १ पदासाठी अर्ज करा !

TISS SDCO Job 2025 - School of Social Work, Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *