वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत 38 पदांची भरती जाहीर !

NHM Yavatmal Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), यवतमाळ आणि जिल्हा समेकित आरोग्य व कुटुंब कल्याण संस्था, यवतमाळ यांच्या वतीने नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीअंतर्गत विशेषतज्ञ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ) तसेच वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी एकूण 38 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करावा. अर्जासाठी आवश्यक तपशील व फॉर्म zpyavatmal.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

NHM Yavatmal Bharti 2025

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF) काळजीपूर्वक वाचावी. या भरतीसाठी कोणतीही पूर्वनोंदणी आवश्यक नसून उमेदवारांना त्यांच्या बायोडाटासह आणि सर्व आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व झेरॉक्स प्रत घेऊन थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

मुलाखती दर महिन्याच्या 15 आणि 30 तारखेला आयोजित करण्यात येणार आहेत. ही भरती वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी असून, इच्छुकांनी दिलेल्या तारखांना वेळेवर उपस्थित राहावे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IUCAA पुणे – रु. ३०,०००/- दरमहा वेतन ; मल्टिमीडिया स्पेशालिस्ट पदावर नोकरीची संधी

IUCAA Pune MMS Job 2026 - Inter-University Center For Astronomy & Astrophysics, Pune invites Online applications in prescribed format......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *