NMMC Bharti 2025 :नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये गट-क आणि गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेने जाहिरातीत दिलेल्या माहितीप्रमाणे, या पदांसाठी शैक्षणिक अर्हता आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी मिळेल.
नवी मुंबई महापालिका भरतीच्या जाहिरातीनुसार, गट-क आणि गट-ड मधील एकूण ६२० पदे प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवांमध्ये उपलब्ध आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मे २०२५ आहे. इच्छुक उमेदवार www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ११ मे २०२५ रोजी रात्री ११:५५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरू शकतात.
परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रांमध्ये नमूद करण्यात येईल. तसेच, कोणत्याही बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती प्रकाशित केली जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक तपशील आणि अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचनांसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता. याशिवाय, संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, वयोमर्यादेतील शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण, आरक्षणाचे तरतुदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना यांसारख्या सर्व महत्त्वाच्या माहितीचा तपशील www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE