एक आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणींसाठी समोर आलेली आहे . ती म्हणजे आता बहुतेक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये नाहीतर २१०० रुपये दरमहा मिळण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये चा लाभ मिळणार काय ? याबाबत मंत्री गिरीश यांच्याकडून मोठे वक्तव्य समोर आले आहे. लाडक्या बहिणी आमच्यावर खूश आहेत, असं गिरीश महाजन यांनी सांगितल. एकंदरीत गिरीश महाजन यांनी भविष्यात 2100 रुपयांबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा विश्वास व्यक्त केलाय.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही शिंदे सरकारने महिलांसाठी सुरु केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना मागच्या वर्षी सुरु करण्यात आली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे.

जुलै २०२४ पासून या योजनेचा महिलांना लाभ दिला जातोय. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले जात आहे. जुलै २०२४ ते मे २०२५ पर्यंत महिलांना एकूण ११ हफ्ते या योजनेअंतर्गत देण्यात आले. त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. या योजनेचा अकरावा हफ्ता हा जुने महिन्याच्या सुरवातीला खात्यात जमा करण्यात आला. त्यामुळे जून चा हफ्ता कधी जमा होणार ? असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. १२ व्या हफ्त्याची महिला फार आतुरतेने वाट बघत आहे.
सध्या जून महिन्याचा हफ्ता १५ ते २० जून २०२५ या तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. जून चा हफ्ता सरळ खात्यात जमा होईल. या काळात जून महिन्याचा हप्ता जमा होतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जून महिन्याचा हप्ता जमा होण्याआधीच मात्र या योजनेच्या संदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे भाष्य केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीकडून लाडक्या बहिणींना पंधराशे ऐवजी 2,100 रुपये दिले जातील अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, आता नवीन सरकार स्थापित होऊन बरेच दिवस उलटले आहेत तरीही 2100 रुपयांबाबत कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना 2100 रुपयांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता.
जळगावात भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत असे सांगितले की, मला वाटत देश आता एवढा विकासाच्या मार्गानं चाललाय. नरेंद्र मोदींचा कार्यकाळ या वर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. सेवा, सुशासन, गरीब कल्याण या योजना किती वेगानं पुढे चाललेत हे बघा.
लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये दिले आहेत. पूर्वी कुणी देत नव्हतं. ठीक आहे, निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं 2100 रुपये देऊ, अजून वर्षही झालं नाही. फक्त सहा – सात महिने झाले आहेत. आम्ही तेही देऊ, सरकार त्याबाबत सकारात्मक विचार करणार आहे. सध्या आर्थिक अडचण आहे. पण असे असतांनाही नियमितपणे पैसे लाडक्या बहिणींना दिले जात आहेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati