NTA JEE Main 2025 Session 2 : देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी जेईई परीक्षा २ ते ९ एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २ ते ४ एप्रिलदरम्यान बी.ई. आणि बी.टेकसाठी पेपर १ ची परीक्षा होईल. ही परीक्षा सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळात घेतली जाईल.
जेईई परीक्षेच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात २ एप्रिलपासून होणार आहे. ७ आणि ८ एप्रिल रोजी बी.ई. आणि बी.टेकसाठी पेपर २ ची परीक्षा होईल, ज्यामध्ये ७ एप्रिलला दोन सत्रांमध्ये परीक्षा होईल, तर ८ एप्रिलला एक सत्र होईल. ९ एप्रिल रोजी बी.आर्च. आणि बी.प्लानिंग अभ्यासक्रमांसाठी पेपर २ए आणि २बी परीक्षा होईल.
या तीन दिवसांच्या परीक्षेसाठीच्या प्रवेशपत्रांची माहिती नंतर उपलब्ध करून दिली जाईल. प्रवेशपत्रे जेईईच्या अधिकृत संकेतस्थळावर डाउनलोडसाठी उपलब्ध असतील. २८ मार्च रोजी विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE