जे उमेदवार पदवी उत्तीर्ण आहेत व ज्यांना उत्तम पगाराची नोकरी पाहिजे आहे. त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) अंतर्गत सहायक पदाच्या ५०० रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु आहे. जे उमेदवार यासाठी इच्छुक आहेत त्यांनी १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावा. निवडलेल्या उमेदवारांना ६२ हजारापर्यंत वेतनश्रेणी मिळणार. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने सहाय्यक (Class III) संवर्गातील पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. एकूण ५०० पदांसाठी ही भरती होत असून, इच्छुक उमेदवारांनी १७ ऑगस्ट २०२५ पूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन कंपनीने केले आहे. भरतीसंबंधी सर्व माहिती कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर http://www.orientalinsurance.org.in उपलब्ध आहे.
या भरतीमध्ये महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांसाठी विशेष संधी असून, राज्यासाठी ६४ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती २०२५ महत्त्वाची माहिती –
- पदाचे नाव: सहाय्यक (वर्ग III संवर्गातील)
- शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा: किमान २१ वर्षे, कमाल ३० वर्षे
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन एकूण रिक्त पदे: ५०० पदे (महाराष्ट्र राज्यात: ६४ पदे) अर्ज शुल्क: खुल्या वर्गासाठी रु. 100/- आणि राखीव वर्गासाठी रु. 850/-
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 02 ऑगस्ट 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2025
पात्रता आणि अटी: या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. तसेच, उमेदवार दहावी, बारावी, इंटरमिजिएट किंवा पदवीपातळीवर इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या राज्याची प्रादेशिक भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे गरजेचे आहे. वयोमर्यादा २१ वर्षांपासून ३० वर्षांपर्यंत असून, काही विशिष्ट प्रवर्गासाठी शासकीय नियमानुसार वयमर्यादेत सूट दिली जाणार आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE