वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आंबेडकर जयंतीच्या दिवशीच ‘या’ राज्याने SC आरक्षणावर घेतला मोठा निर्णय !

On Ambedkar Jayanti, this state takes a major decision on SC reservation : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी तेलंगणा सरकारने अनुसूचित जातींसंबंधी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. रेड्डी सरकारने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गाचे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्याचे आदेश जाहीर केले .

लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हा निर्णय घेणारे तेलंगणा हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे. जलसंपदा मंत्री एन. उत्तम कुमार रेड्डी यांनी या निर्णयाची सविस्तर माहिती दिली आहे. याआधी तेलंगणा सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश शमीम अख्तर यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमला होता.

SC Reservation

आयोगाने दिलेल्या शिफारशीनुसार, सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण क्षेत्रातील १५ टक्के आरक्षणाचा अधिक समतोल लाभ देण्यासाठी ५९ अनुसूचित जाती समुदायांचे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे – गट अ, गट क, आणि गट तृतीय. गट-१ मध्ये सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सर्वाधिक वंचित १५ समुदायांचा समावेश असून त्यांना १ टक्का आरक्षण दिले जाईल. गट-२ मध्ये १८ मध्यम लाभप्राप्त समुदाय आहेत,

ज्यांना ९ टक्के आरक्षण मिळेल. तर गट-३ मध्ये २६ लक्षणीय लाभप्राप्त समुदायांचा समावेश असून त्यांना ५ टक्के आरक्षण दिले जाईल. हा कायदा ८ एप्रिल २०२५ रोजी राज्यपालांकडून मंजूर करण्यात आला आणि १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी तेलंगणा राजपत्रात अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आला.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MPKV COA पुणे – रु. ५०,०००/- दरमहा वेतन ; १ वैदयकीय पदभरती जाहीर

MPKV COA Pune MO Job 2025 - Associate Dean, College of Agriculture, Pune invites Offline applications in prescribed.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *