All India National Educational Federation अंतर्गत महाराष्ट्र तसेच देशभरातील सर्व शाळांमध्ये संस्कारक्षम उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. १ सप्टेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये ‘आपलं विद्यालय आपला स्वाभिमान’ या संकल्प दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ज्ञान, संस्कार, शिस्त, परंपरा यासारख्या उच्च मूल्यांची जाणीव होईल. तसेच विद्यार्थी व विद्यालय यांच्यातील नातेसंबंध अधिक दृढ होतील.
शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेतील वातावरण शाळेबद्दलची आत्मीय भावना आणि शाळेचा अभिमान निर्माण करण्याचे कार्य शिक्षकांच्या प्रेरणेने घडत असते.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महापुरुषांची परंपरा घडवण्याचे कार्य शिक्षकांनी केले आहे. त्यामुळे ‘आपलं विद्यालय आपला स्वाभिमान’ हा संस्कार सोहळा सर्व शाळांमध्ये व्हावा अशी अपेक्षा ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले आहे. तसेच या उपक्रमात शुभेच्छा संदेश दिला आहे
या संकल्प दिनाच्या निमित्ताने येत्या एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आपल्या विद्यालय आपला स्वाभिमान या विषयावर प्रश्नोत्तर स्पर्धा चर्चासत्र शालेय सभासदांचा सहभाग तसेच सांस्कृतिक कार्यक्रम शिक्षक सन्मान समाज उपयोगी उपक्रम अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षक पालक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व समाजातील सर्व घटक यांचा यात सक्रिय सहभाग घडवून आणणे आवश्यक आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संचालक महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ उच्च शिक्षण विभाग यांच्याकडून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लागेल तसेच शैक्षणिक परंपरेबरोबरच देशभक्ती व सामाजिक जाणीव दृढ होतील अशी ही आशा जयकुमार गोरे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE