Over 700 Doctors to Be Recruited Soon in Municipal Hospitals : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये लवकरच ७०० हून अधिक डॉक्टरांची भरती; रिक्त पदे भरून रुग्णसेवा आणि शिक्षण अधिक प्रभावी होणार मुंबईतील केईएम, सायन, नायर आणि कूपर यांसारख्या महापालिकेच्या प्रमुख वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेली अडचण लवकरच दूर होणार आहे.
महापालिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ७०० हून अधिक डॉक्टरांच्या पदांची भरती करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.ही भरती प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि इतर पूर्णवेळ पदांसाठी होणार असून, यामुळे वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेचा दर्जा उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सध्या महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एकूण ८९१ सहाय्यक प्राध्यापक पदे आहेत, त्यापैकी ४३९ पदे रिक्त आहेत. या रिक्त जागा अनेक वर्षांपासून भरल्या गेल्या नसल्यामुळे सध्या काही प्राध्यापक कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत, त्यातले अनेक सात ते आठ वर्षांपासून करारावर कार्यरत आहेत. परिणामी, शिक्षकांवर कामाचा ताण वाढला असून, याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर, प्रशासनावर आणि रुग्णसेवेवर होत आहे.
आरक्षण धोरणातील बदलांमुळे या भरती प्रक्रियेला काही काळ विलंब झाला होता. मात्र, अलीकडे महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर सर्व संबंधित कागदपत्रे नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आली आहेत. आता अंतिम परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरु असून, लवकरच अधिकृत भरती अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
ही भरती पूर्णत्वास गेल्यास मुंबईतील महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेला मोठा दिलासा मिळणार असून, रुग्णसेवा आणि वैद्यकीय शिक्षण या दोन्ही क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati