वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

आनंदाची बातमी!! बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना ; मिळणार १२००० रुपये थेट खात्यात जमा ! योजनेचा लाभ घ्या

बांधकाम कामगारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना जाहीर केलेली आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या कामगारांना दरवर्षी १२०००  रुपये पेन्शन मिळणार आहे. ही योजना ६० वर्ष वयाच्या बांधकाम कामगारांसाठी आहे.  या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन करायचा आहे. अर्ज कसा करायचा , पात्रता काय आहे , योजनेचे नियम या बद्दल सविस्तर जाणून घ्या. योजनेची अधिक माहिती खाली दिलेली आहे.

बांधकाम कामगारांसाठी ही योजना केवळ आर्थिक मदतीचं साधन नाही, तर त्यांच्या निष्ठावान सेवेला दिलेला सरकारी सलाम आहे. ही पेन्शन योजना म्हणजे त्यांच्या कष्टांना मिळालेलं मान्यतेचं प्रमाणपत्र आहे.

Bandhkam kamgar penshion Yojana 2025

राज्यात लाखो बांधकाम कामगार आहेत. हे कामगार दिवस रात्र मेहनत करून मोठी शहरे उभी करतात. हे कामगार वर्षानुवर्षे काम करतात त्यांचं सुद्धा निवृत्तीचं वय येत. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना त्यांचं आयुष्य सुसह्य पणे जगता याव. यासाठी महारष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळाने एक महत्वाची योजना आणण्याचे सुरु केले. या योजनेअंतर्गत पात्र कामगारांना दरवर्षी  १ २,०००   रुपये पर्यंत पेन्शन मिळणार आहे ,  ही योजना लवकरच लागू होणार आहे.

योजना कोणासाठी आहे. 

ही योजना विशेषतः महाराष्ट्र भवन व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असलेल्या कामगारांसाठी आहे. सध्या राज्यात सुमारे 37 लाख नोंदणीकृत कामगार आहेत, आणि अजून 16 लाख जणांचे नूतनीकरण बाकी आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा 

या योजनेसाठी कामगारांना अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे केला जाईल पात्र व्यक्तींना “पेन्शन नंबर प्रमाणपत्र” दिलं जाईल त्या प्रमाणपत्रावरील दिनांकापासून पेन्शन सुरू होईल अर्जाच्या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली वापरली जाईल.

पेन्शन मृत्यूनंतरही थांबणार नाही! जर एखाद्या पेन्शनधारक कामगाराचा मृत्यू झाला, तर त्यांचा जीवनसाथी हयात असेल, तर तो व्यक्ती ही पेन्शन घेण्यास पात्र ठरेल. मात्र, जर जीवनसाथी आधीपासूनच पेन्शन घेत असेल, तर दुहेरी लाभ दिला जाणार नाही.

पेन्शन सुरू राहण्यासाठी पेन्शनधारकांनी दरवर्षी स्वतःच्या अस्तित्वाचा पुरावा (Life Certificate) सादर करणे बंधनकारक असेल. त्यासोबतच, जर बँक खाते बदलायचे असेल किंवा वारस नोंदवायचा असेल, तर त्यासाठीही वेगळी प्रक्रिया उपलब्ध असेल.

सध्या 60 वर्षांवरील कामगारांना नूतनीकरणाची परवानगी नाही, त्यामुळे त्यांना मंडळाच्या इतर लाभांपासून वंचित राहावं लागतं. पण ही नवीन पेन्शन योजना त्यांच्यासाठी दिलासा ठरणार आहे.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

प्रज्वल नागरी सह. पत. मर्या., नागपूर – ‘या’ पदांच्या एकूण ५ भरती अंतर्गत नोकरीची संधी

PNSPS Nagpur Recruitment 2025 - Prajwal Nagri Sahakari Patsanstha Maryadit, Nagpur invites Offline applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *