वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खूप मोठी दुर्घटना ! हवाई दलाचे विमान शाळेवर कोसळले ; विद्यार्थी जखमी झाले !

बांगलादेशमध्ये मोठी विमान दुर्घटना घडली आहे. हवाई दलाचे प्रशिक्षण विमान ढाका येथील उत्तर भागातील एका शाळेच्या परिसरात कोसळले आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाली असल्याची माहिती शाळा प्रशासनाने आणि लष्कर व अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

द डेली स्टारने माइलस्टोन कॉलेजच्या शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, लढाऊ विमान माइलस्टोन कॉलेज कॅम्पसमधील तीन मजली इमारतीवर आदळले. त्यानंतर महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. काही विद्यार्थी इमारतीत अडकले असल्याचा अंदाज आहे. दुर्घटना घडल्याने महाविद्यालयाचे शिक्षक आणि कर्मचारी त्यांना वाचवण्यासाठी धावले. शिक्षकांच्या मते, इमारतीतील अनेक विद्यार्थी गंभीरपणे भाजले आहेत.

Plane Crash into Bangladesh

F-7 BGI हे विमान ढाकाच्या उतारा भागातील माइलस्टोन स्कूल आणि कॉलेजच्या परिसरात दुपारी कोसळले आहे. शाळेत मुले उपस्थित असताना ही दुर्घटना घडली आहे. बांगलादेश सैन्याच्या जनसंपर्क कार्यालयाने एका संक्षिप्त निवेदनात पुष्टी केली की कोसळलेले F-7 BGI विमान हे हवाई दलाचे होते.

अग्निशमन दलाते अधिकारी सांगितले की किमान एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बांगलादेशी माध्यमांनुसार, हवाई दलाचे FT-7BGI हे एक प्रशिक्षण विमान आहे. इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सच्या मते, लढाऊ विमानाने दुपारी १:०६ वाजता उड्डाण केले आणि दुपारी १:३० वाजता ते अपघातग्रस्त झाले. हजरत शाहजहां आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अपघाताची पुष्टी केली आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

TISS SSW – MA (Social Work) ; रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर १ पदासाठी अर्ज करा !

TISS SDCO Job 2025 - School of Social Work, Tata Institute Of Social Sciences, Mumbai invites Online applications till......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *