PM आवास योजना अंतर्गत शहरी भागातील नागरिकांसाठी सब्सिडी मिळणार आहे. शहरात राहणाऱ्या आणि स्वतः च घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी संधी आहे. PM आवास योजना शहरी सब्सिडी २०२५ साठी नवीन अर्ज स्वीकारले जात आहे. भारत सरकारने शहरातील गरीब व मध्यमवर्गीय लोकांना घर खरेदीसाठी सब्सिडीचा लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरु केली आहे.
PM आवास योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे, जी शहरी भागात राहणाऱ्या बेघर कुटुंबाना पक्क घर घेण्यासाठी आर्थिक मदत करते.
नागरिकांनी जर गृहकर्ज घेतलं असेल, तर त्याच्या व्याजावर सरकारकडून सब्सिडी दिली जाते. जर तुम्ही पात्र असाल आणि गृहकर्ज घेऊन घर घेतलं असेल, तर ₹2.30 लाखांपर्यंतची सब्सिडी सरकार तुमच्या खात्यात थेट जमा करते. ही रक्कम तुमच्या व्याजाच्या एकूण रकमेतून वजा केली जाते, ज्यामुळे EMI कमी होते आणि घर घेणं सुलभ होतं.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी
- अर्जदार भारतीय नागरिक असावा.
- अर्जदाराकडे स्वतःचं पक्कं घर नसावं.
- अर्जदाराचं उत्पन्न खालीलपैकी कोणत्या वर्गात येतं हे तपासलं जातं:
- EWS (Economic Weaker Section) – ₹3 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न
- LIG (Low Income Group) – ₹3 ते ₹6 लाख
- MIG-1 (Middle Income Group-1) – ₹6 ते ₹12 लाख
- MIG-2 (Middle Income Group-2) – ₹12 ते ₹18 लाख
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने यापूर्वी ही योजना घेतलेली नसावी.
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रं
- आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास)
- बँक पासबुक
- पॅन कार्ड
- स्वघोषणा पत्र
- मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी
- पासपोर्ट साइज फोटो
- PM आवास योजना शहरी सब्सिडीसाठी अर्ज कसा कराल?
- अधिकृत वेबसाइटला भेट द्या: pmaymis.gov.in “Citizen Assessment” विभागात जा.
- तुमच्या उत्पन्न गटानुसार EWS, LIG, MIG-I, MIG-II यापैकी योग्य पर्याय निवडा.
- तुमचा आधार क्रमांक टाका आणि “Generate OTP” वर क्लिक करा.
- आलेला OTP टाकून पुढील फॉर्म भरावा.
- तुमचं अर्ज फॉर्म व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.
- शेवटी अर्ज सबमिट करा.
PM आवास योजना शहरी सब्सिडी 2025 ही सरकारकडून दिली जाणारी एक सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही शहरात राहता आणि स्वतःचं घर घेण्याचा विचार करत असाल, तर ही योजना तुमचं स्वप्न पूर्ण करू शकते. आजच अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करा आणि ₹2.30 लाखांपर्यंतच्या सब्सिडीचा लाभ घ्या.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE