प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना २००० रुपये मिळतात . पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता १८ जुलै पर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात. सहा हजार रुपये वर्षात ३ वेळा , म्हणजे दोन हजार रुपये अशा तीन हफ्त्यामध्ये दिले जातात.
१९ वा हफ्ता २४ फेब्रुवारीला जमा झाला होता. शेतकरी पुढील २० व्या हफ्त्याची वाट पाहत आहे. एप्रिल ते जुलै या कालावधीचा हफ्ता अजून आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.

३१ जुलैच्या आत २० वा हफ्ता येण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजना ही २०१९ पासून सुरु आहे. आणि आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ऐकूण ३ .६४ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत. या योजनेत पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळतो. ज्यांच्याकडे स्वतःची शेती आहे , ज्यांनी ई -केवायसी पूर्ण केली आहे, ज्याचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे , अशा शेतकऱ्यांनाच हफ्ता मिळतो.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त पीएम किसान नव्हे, तर राज्य सरकारकडून ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी’ अंतर्गत अजून ६,००० रुपये मिळतात. त्यामुळे त्यांना वर्षाला एकूण १२,००० रुपयांची मदत होते. यंदाही हप्ता जाहीर करण्यासाठी प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते मोठा कार्यक्रम होऊ शकतो.
त्यानंतर पैसे हळूहळू शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होतील. काही वेळा तांत्रिक कारणामुळे रक्कम येण्यास २ दिवस लागू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आणि आधार लिंक असल्याची खात्री करून घ्यावी.
ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे कारण यामुळे त्यांच्या शेतीसाठी थोडा आर्थिक आधार मिळतो. शासनाच्या मते पुढे ही योजना अधिक पारदर्शक आणि सोपी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati