केंद्रसरकार अंतर्गत तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी दिलासा दायक बातमी आहे. PM – VBRY पीएम विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत १ ऑगस्ट २०२५ पासून देशातील पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून १५००० रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या .
केंद्र सरकारने रोजगार प्रोत्साहनासाठी ‘एम्प्लॉयमेंट लिंक्ड इंसेटिव्ह (ELI)’ योजनेतून ९९,४४६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या योजनेचे नाव बदलून ‘प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PM-VBRY)’ असे करण्यात आले आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही योजना १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार असून, पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या आणि ईपीएफओ (EPFO) खाते उघडणाऱ्या कर्मचार्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेचा लाभ कसा मिळेल ?
पहिला टप्पा: कर्मचारी किमान ६ महिने नोकरीत कायम राहिल्यानंतर मिळेल.
दुसरा टप्पा: १२ महिने पूर्ण केल्यानंतर आणि आर्थिक साक्षरता कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर दिला जाईल.
या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
- योजनेचा लाभ १ लाख रुपये पर्यंत पगार असलेल्या कर्मचार्यांनाही मिळू शकतो.
- ही योजना नवीन नोकऱ्या निर्माण करण्यास प्रोत्साहन देईल.
- केंद्र सरकार कंपन्यांनाही प्रति नवीन कर्मचारी ३,००० रुपये दरमहा दोन वर्षे देईल.
- मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार असून, तिसऱ्या व चौथ्या वर्षीही लाभ मिळू शकतो
या योजनेअंतर्गत कंपन्यांसाठी काय अटी आहेत ?
- जर कंपनीमध्ये ५० पेक्षा कमी कर्मचारी असतील, तर किमान २ नवीन भरती करावी लागेल.
- जर ५० पेक्षा जास्त कर्मचारी EPFO मध्ये नोंदणीकृत असतील, तर ५ नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल.
- हे नवीन कर्मचारी किमान ६ महिने कंपनीत कार्यरत राहिले पाहिजेत.
या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ?
या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे उद्दिष्ट २ वर्षांत ३.५ कोटींपेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण करण्याचे आहे. यामध्ये १.९२ कोटी लाभार्थी हे पहिल्यांदाच नोकरी करणारे असतील. ही योजना १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीतच निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लागू राहील.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE