JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वयोमर्यादेचा अडसर नको!! पोलिस शिपाई भरतीबाबत उमेदवारांची मागणी

Chief Minister Eknath Shinde give opportunity to candidates who are ineligible due to age limit for the ongoing police constable recruitment in the state. These candidates have made this demand based on the ordinance issued by the General Administration Department in March 2023. This demand letter has mentioned that there are 10 thousand such candidates across the state.

According to the ordinance announced by the General Administration Department, due to Corona, defective application forms or non-sending of application forms, not enough advertisements have been published for the recruitment of many posts, due to which many candidates have lost their chances to appear in the examination due to exceeding the age limit. For such candidates to apply for advertisement published by 31st December 2023.

राज्यात सुरू असलेल्या पोलिस शिपाई भरतीसाठी वयोमर्यादेमुळे अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी, या भरतीची संधी देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मार्च २०२३ मध्ये सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या अध्यादेशाचा आधार घेत या उमेदवारांनी ही मागणी केली आहे. राज्यभरात असे १० हजार उमेदवार असल्याचे या मागणीपत्र नमूद करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केलेल्या अध्यादेशानुसार करोना, सदोष मागणीपत्रे किंवा मागणीपत्रे न पाठविणे यामुळे अनेक पदांच्या भरतीसाठी पुरेशा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या नसून, यामुळे वयोमार्यादा ओलांडल्याने अनेक उमेदवारांनी परीक्षेला बसण्याच्या संधी गमावल्या आहेत. अशा उमेदवारांसाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करण्यात.

वयोमर्यादेची अट खुल्या व आरक्षित प्रवर्गासाठी दोन ते पाच वर्षांनी शिथिल करण्यात आली होती. या अध्यादेशाचा आधार घेत पोलिस शिपाई भरतीसाठीही हा नियम लागू करण्याची मागणी या उमेदवारांमधून होत आहे. याबाबत या उमेदवारांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून भरती प्रक्रियेबाबत पाठपुरावा करीत असून, लवकर पोलिस शिपाई भरती करण्याची मागणी केल्याचे या पत्रात नमूद केले आहे.

पोलिस भरतीची जाहिरात ३१ डिसेंबरपूर्वी निघणे अपेक्षित असताना, ही जाहिरात फेब्रुवारीत काढण्यात आली. या तीन महिन्यात अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा ओलांडली. जाहिरात वेळेत प्रसिद्ध झाली असता सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना या निर्णयाचा लाभ झाला असता. त्यामुळे या २०२२-२३ च्या भरती प्रक्रियेसाठी २०२१-२२ नुसार वयगणना करावी किंवा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना एक संधी द्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *