JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अनेक युवक-युवती पोलिस भरतीपासून राहणार वंचित, वयाबाबतच्या निर्णयास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढीची मागणी

Police Recruitment 2024 has been announced. Advertisement has been released for 17 thousand 441 posts. Forms are to be filled online from 5th March 2024 to 31st March 2024. Only one police has been recruited from the year 2019 to the end of 2023. So many candidates were disqualified due to age condition. To give relief to them, a government decision was issued on March 3, 2023. The age was extended till December 2023. But before December 2023, the police recruitment advertisement was not released. Therefore, the concerned candidates did not get the benefit of the government decision of 3 March 2023 regarding age restriction. Many candidates have demanded that the government decision of 3 March 2023 should be extended till 31 March 2024 to give relief to these candidates.

पोलिस भरतीची जाहिरात डिसेंबर २०२३ पूर्वी न निघाल्याने वयोमयदिसंदर्भात मार्च २०२३ मध्ये निघालेल्या शासन निर्णयाचा लाभ अनेक उमेदवारांना होणार नाही. हे उमेदवार पोलिस भरतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे वयोमयदिसंदर्भातील शासन निर्णयास ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी अनेक युवक-युवतींनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

पोलिस भरतीबाबत २०२४ मध्ये घोषणा झाली आहे. १७ हजार ४४१ पदांसाठी जाहिरात निघाली आहे. ५ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२४ अखेर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावयाचे आहेत. सन २०१९ ते २०२३ अखेर एकच पोलिस भरती झालेली आहे. त्यामुळे अनेक उमेदवार वयाच्या अटीमुळे अपात्र ठरत होते. त्यांना दिलासा देण्यासाठी ३ मार्च २०२३ रोजी शासननिर्णय निघाला. डिसेंबर २०२३ पर्यंत वय वाढवून दिले. मात्र डिसेंबर २०२३ पूर्वी पोलिस भरतीची जाहिरात निघाली नाही. त्यामुळे वयोमयदिसंदर्भातील ३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयाचा लाभ संबंधित उमेदवारांना मिळाला नाही. या उमेदवारांना दिलासा देण्यासाठी ३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयाला ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ मिळावी, अशी मागणी अनेक उमेदवारांनी केली आहे.

छत्तीसगड राज्यात २०२४ मध्ये छत्तीसगड ५ वर्षे, राजस्थानमध्ये ४ वर्षे, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच केंद्रीय बोर्ड यांनी ३ वर्षे वय वाढवून दिले आहे. महाराष्ट्रात फक्त ३१ मार्च २०२४ पर्यंत वय वाढवून मिळण्याची मागणी आम्ही करत आहोत, ती मान्य करावी, अशी मागणी पोलिस भरती इच्छुक उमेदवारांनी केली आहे. मागील पाच वर्षापासून कारागृह तसेच बँड पथक भरती झाली नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *