JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

५० हजार उमेदवार पोलिस भरतीपासून वंचित राहण्याचा धोका !!

On the one hand, the ruling party and the opposition are busy preparing for the Lok Sabha elections, but the dreams of millions of youths in the state are being watered down. After almost five years, the government has announced the recruitment of 17,471 posts of police constables. However, due to the suspension of this recruitment during the Corona period, the age limit of many candidates has expired.

Validity of Government Order dated March, 2023. Even if extended till 31st March, these candidates will get one chance to attempt. However, for the last fifteen days, candidates across the state have been troubling the thresholds of the government, but their demands are being ignored. In 2019, the recruitment process in the state was stopped due to Corona. After that, the police recruitment for 17,471 posts has been announced. Lakhs of candidates were waiting for this recruitment for last 5 years. In March, 2023, the upper age limit was extended by two years. However, according to that decision, applications for police recruitment were expected before December.

एकीकडे सत्ताधारी, विरोधक हे लोकसभा निवडणुकांच्या तयारीत व्यस्त झालेले असताना राज्यातील लाखो तरुण- तरुणींच्या स्वप्नांवर मात्र पाणी फेरले जात आहे. शासनातर्फे तब्बल पाच वर्षांनंतर पोलिस शिपायांच्या १७,४७१ जागांची भरती जाहीर केली. मात्र, कोरोना काळात ही भरती रखडल्याने अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपली आहे.

मार्च, २०२३ च्या शासन आदेशाची वैधता दि. ३१ मार्चपर्यंत जरी वाढवली तरी या उमेदवारांना प्रयत्नासाठी एक संधी मिळेल. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून राज्यभरातील उमेदवार सरकारचे उंबरठे झिजवत असताना त्यांच्या मागण्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. २०१९ मध्ये कोरोनामुळे राज्यातील भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. त्यानंतर आता १७,४७१ जागांची पोलिस भरती जाहीर झाली. गेल्या ५ वर्षांपासून लाखो उमेदवार या भरतीकडे आस लावून होते. मार्च, २०२३ मध्ये यासाठी दोन वर्षे कमाल वयोमर्यादा वाढविण्यात आली. मात्र, त्या निर्णयानुसार डिसेंबरआधी पोलिस भरतीसाठी अर्ज घेणे अपेक्षित होते.

डिसेंबरमध्ये विद्यार्थ्यांनी हिवाळी अधिवेशनात या मागणीसाठी लाक्षणिक मोर्चा काढत ही आग्रही मागणी केली होती. मात्र, नुकतीच निघालेली जाहिरात ३१ डिसेंबर २०२३ पर्यंतच्या वैधतेला अनुसरून काढण्यात आली. परिणामी, आता ५० हजारांपेक्षा अधिक उमेदवार वय वाढल्याने भरतीसाठी अपात्र ठरणार आहेत.

नेमकी मागणी काय?

• ३ मार्च २०२३ रोजी सामान्य प्रशासन विभागामार्फत २ वर्ष कमाल वयोमर्यादा वाढवून देण्यात आली होती. त्यानुसार ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत भरती होणे अपेक्षित होते.

• ही भरती २०२२-२३ साठी आहे. त्यानुसार यात वय गणना २०२१-२२ व २०२३ या वर्षांतील करावी किंवा २०२१-२२ व २०२३ या वर्षात वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांना केवळ एक संधी द्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *