JOIN Telegram
Tuesday , 14 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

पूजा खेडकरनंतर UPSC च्या रडारवर आणखी 6 सनदी अधिकारी! प्रमाणपत्रांची केली जात आहे तपासणी!

पूजा खेडकरनंतर UPSC च्या रडारवर आणखी 6 सनदी अधिकारी! प्रमाणपत्रांची केली जात आहे तपासणी!

Pooja Khedkar News :

पूजा खेडकरचे ट्रेनी आयएएस पद रद्द करण्यात आले आहे. पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर अजून काही अधिकाऱ्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राची तपासणी केली जात आहे. सुत्रानुसार या चौकशीमध्ये 5 आयएएस आणि 1 आयआरएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पूजा खेडकर प्रकरणाची चर्चा देशभर होती. युपीएससी कडून या प्रकरणी कठोर पाऊले उचलण्यात आली. पूजा खेडकरचे ट्रेनी आयएएस पद रद्द करण्यात आले आहे. पूजा खेडकरच्या प्रकरणानंतर अजून काही अधिकाऱ्यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राची तपासणी केली जात आहे. सुत्रानुसार कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाद्वारे अन्य काही सनदी अधिकाऱ्यांचे आरोग्य प्रमाणपत्राची तपासणी केली जात आहे. या चौकशीमध्ये 5 आयएएस आणि 1 आयआरएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

दरम्यान, फसवणूक आणि बनावटगिरीच्या गुन्ह्यातील आरोपी ट्रेनी आयएएस पूजा खेडकरने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी दिल्ली न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. त्याचसोबत तपास यंत्रणेने तपासाची व्याप्ती वाढवावी, असे आदेश न्यायालयाने दिले. ज्यांनी ओबीसी कोट्यातील अनुज्ञेय वयोमर्यादेच्या पलीकडे लाभ घेतला आहे आणि ज्यांना ते पात्र नसतानाही अपंगत्वाचा लाभ घेतला आहेत अशा अलीकडच्या कालावधीमध्ये शिफारस केलेल्या उमेदवारांची ओळख पटवण्याचे निर्देश एजन्सीला देण्यात आले आहेत.

युपीएससीने पूजा खेडकरविरुध्द परीक्षा नियम आणि निर्देशाच्या उल्लंघन केले या आरोपांना योग्य ठरविले होते. केंद्रसरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सांगितले की, युपीएससी ने उपलब्ध असलेल्या रेकॉर्डची तपासणी केली आणि सीएसई 2022 च्या नियमांचे पूजा कडून उल्लंघन झाले हे स्पष्ट आहे. सीएसई 2022 ची पूजाची उम्मेदवारी रद्द करण्यात आली तसेच तिला भविष्यातील परीक्षांमधून प्रतिबंधित केले आहे.

पूजा खेडकरला तिची ओळख चुकीची सांगून परीक्षा नियमांमध्ये विहित केलेल्या मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल युपीएससीने कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. यूपीएससीच्या म्हणण्यानुसार पूजा खेडकरने 25 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत वेळ मागितली होती. आयोगाने या विनंतीचा विचार करून 30 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजेपर्यंत वेळ दिला असून, ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट केले होते. पूजा खेडकरने आयोगासमोर आपले म्हणणे विहित कालावधीत मांडले नाही आणि तिच्या अडचणी वाढल्या.

 

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *