Postgraduate medical courses वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत यंदा मोठा बदल (Big change in admission process) घडत असून, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून (National Commission for Medical Sciences) तब्बल चार हजार १४० नव्या जागांना मान्यता (4,140 new seats approved) देण्यात आली आहे. या जागांचा प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत समावेश होण्याची शक्यता असल्याने, पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रात १८१ नव्या जागा वाढल्या. या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना देखीय या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे राज्यात एकूण १८१ नव्या पदव्युत्तर जागांची भर पडली आहे. विशेषतः त्वचाविज्ञान व कुष्ठरोग, रेडिओ निदान, शस्त्रक्रिया, श्वसन वैद्यक, रेडिएशन ऑन्कोलॉजी, कान-नाक-घसा विकार, नेत्ररोग, मानसोपचार, बालरोग, अस्थिव्यंगशास्त्र, भूलतज्ज्ञ, प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगशास्त्र या अभ्यासक्रमांमध्ये जागा वाढल्या आहेत. त्यामुळे हा भावी डाॅक्टरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांची पहिली फेरी नुकतीच पार पडली असून, येत्या काही दिवसांत दुसरी फेरी सुरू होणार आहे. सध्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागा अत्यल्प असल्याने प्रवेशासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही जागा कमी असल्यामुळे प्रवेशापासून वंचित राहावे लागत होते. या पार्श्वभूमीवर, देशभरात झालेली ही ५५ टक्क्यांची वाढ अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने मान्यता दिलेल्या या चार हजार १४० जागांसाठी संबंधित राज्ये व वैद्यकीय महाविद्यालयांकडील औपचारिक मान्यतेची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ती वेळेत पूर्ण झाल्यास, या जागांचा समावेश प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीत होण्याची दाट शक्यता आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati