वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सरकारच्या ‘या’ योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ६००० रुपये वार्षिक मदत !

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत, पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये दिले जातात, जे 3 समान हफ्त्यात 2,000 रुपये प्रति महिना दिले जातात.

योजनेतील निधी शेतकऱ्यांच्या कृषी संबंधित कामांसाठी उपयोगी पडतो. 2019 मध्ये या योजनेची घोषणा झाल्यानंतर, शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पोहचवण्यासाठी विविध प्रयत्न केले गेले. आतापर्यंत शेतकऱ्यांना 19 हप्त्यांचे वितरण करण्यात आले असून, लवकरच 20 व्या हप्त्याचे वितरण होणार आहे.

PM Kissan Samman Nidhi Yojana Update

तर, शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ कसा मिळेल आणि याचे फायदे काय आहेत, हे आज आपण पाहूया.

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्रता:
शेतकऱ्यांना शेतजमीन असावी.

अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या जमिनीच्या नोंदींमध्ये नोंदवलेले असावे.

अर्ज प्रक्रिया:

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे. सर्वप्रथम, शेतकऱ्यांना पीएम किसान वेबसाइटवर जावे लागेल.

वेबसाइटच्या होमपेजवर “New Farmer Registration” या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर 12 अंकी आधार नंबर भरावा लागेल.

शेतकऱ्यांना मोबाईल नंबर टाकून देखील ऑनलाइन अर्ज करता येईल.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा.

पीएम किसान सन्मान निधी योजनेची अर्ज प्रक्रिया सोपी आणि सहज आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळवून, शेतीसाठी आवश्यक असलेल्या आर्थिक मदतीचा फायदा होईल.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

स्वा. स्व. श्री. शिवाजी नाथाजी पाटील ग्रा. बि. शेती सह. क्रे. संस्था मर्या., जि. कोल्हापूर – १० वी पास/इतर ; शिपाई/इतर पदांसाठी मुलाखत आयोजित

SP Patsanstha Recruitment 2025 - Freedomfighter Late Mr. Shivaji Nathaji Patil Gramin Bigar Sheti Sahakari Credit Sanstha......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *