Pune Mahapalika Bharti Exam2026 : A good news has come out for the youth. This news will give relief to the youth. The recruitment process for the posts of Pune Municipal Corporation Junior Engineer (Civil) was to be held first. It was canceled due to the election code of conduct. Pune Mahapalika Bharti Exam2026 That recruitment process will start again. The examination conducted under this recruitment will be held on 22, 23 and 29 April 2026. Know more information about the examination.
तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे तरुणांना दिलासा मिळणार आहे. पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांची भरती प्रक्रिया पहिले होणार होती. ती निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रद्द करण्यात आली होती. त्या भारतीप्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार आहे. या भरती अंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा २२,२३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात येणार आहे. परीक्षेसंदर्भातील अधिक माहिती जाणून घ्या.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

खुशखबर , तब्बल पावणेदोन वर्षांपासून रखडलेली पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांची भरती प्रक्रिया अखेर सुरु होणार , परीक्षेला पुन्हा एकदा घेतली जाणार . महाराष्ट्र राज्यातील एकूण सात केंद्रांवर २२, २३ आणि २९ एप्रिल २०२६ रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पुणे महापालिका या भरतीसाठी तब्बल ४२ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
तसेच , पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये बांधकाम, पथ, मलनिस्सारण, पाणी पुरवठा आणि प्रकल्प विभागात कनिष्ठ अभियंत्यांची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. त्याच्या कारणामुळे अनेक विकासकामे रखडली असून, प्रशासनावर अधिक ताण वाढला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता कनिष्ठ अभियंत्यांची भरती तातडीने करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
याआधी १३५ कनिष्ठ अभियंता पदांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर १६९ जागांसाठी नव्याने अर्ज मागविण्यात आले. परंतु प्रशासनाच्या संथ कारभारामुळे ही प्रक्रिया दीर्घकाळ लांबणीवर राहिली. त्यातच पुणे महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ही भरती रद्द करण्यात आली. त्यानंतर पुढे परीक्षार्थीच्या आक्षेपांमुळेही परीक्षा स्थगित करण्याची वेळ आली होती. या सर्व घडामोडींमुळे
उमेदवारांमध्ये नाराजी आहे. आता मात्र प्रशासनाने हालचालींना वेग देत परीक्षा घेण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे.
पुणे महापालिका भरती संदर्भातील परीक्षा मुंबई, पुणे, संभाजीनगर, कोल्हापूर, नागपूर, नांदेड आणि नाशिक या सात शहरांमध्ये होणार आहे. ही परीक्षा २२ , २३ एप्रिल रोजी दोन सत्रांमध्ये, तर २९ एप्रिल २०२६ रोजी तीन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. ‘आयबीपीएस’च्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . याबद्दल माहिती अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी दिली.
पुणे महापालिका भरतीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. १६९ जागांसाठी ४२ हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी सुमारे साडेआठ हजार अर्ज पुणे शहरातील उमेदवारांचे आहेत. उर्वरित अर्ज राज्यातील विविध भागांतून आल्यामुळे सात केंद्रांवर परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे महापालिका भरती परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पणे पार पाडण्यासाठी , प्रशासनाने कडक उपाययोजना आखल्या आहेत. प्रत्येक खोलीत १०० परीक्षार्थीमागे दोन पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच परीक्षेच्या केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये तो रोखण्यासाठी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. दीर्घकाळ रखडलेली ही भरती अखेर मार्गी लागल्याने तरी परीक्षा सुरळीत आणि वादमुक्त पार पडते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati