JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्जास मुदतवाढ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ११ मार्चपर्यंत ऑनलाइन भरता येणार अर्ज

Savitribai Phule Pune University students have been extended the deadline to apply for scholarships and financial aid schemes for the academic year 2023-24. Due to this, the students who have not yet filled the applications will be able to fill the online applications till March 11. Scholarships are awarded to economically weaker sections, meritorious, backward class students enrolled in the degree and post-graduate non-professional courses of the university department as well as affiliated colleges..

Application India should attach the required documents with the application

Eligible students who have not yet filled the application form by the University. They have been given an opportunity to fill the application till March 11. Students can visit http://bcud. unipune. Apply on the website ac.in/Scholorships/Applicant/Login.aspx and attach the required documents with the application. After that, the Vice Chancellor has clarified that colleges and departments should scrutinize the online application and submit it to the university online by March 13 from the college code.

सावित्रीबाई फुले पुणे  विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती तसेच अर्थसाहाय्य योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज भरले नाहीत त्यांना येत्या ११ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. विद्यापीठातील विभाग तसेच संलग्न महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटक, गुणवत्ताधारक, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

विद्यापीठामार्फत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसाहाय्य योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसाहाय्य योजना, महात्मा जोतीराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना, छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती, स्वामी विवेकानंद विद्यार्थी साहाय्य योजना आणि छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती देण्यात येतात. विविध शिष्यवृत्ती आणि अर्थसाहाय्य योजनांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडून संबंधित महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागामार्फत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी ६ मार्चपर्यंत मुदत दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *