Railway Recruitment 2025 : भारतीय रेल्वेने असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी देशभरात 9,950 रिक्त पदांच्या भरतीसाठी मान्यता दिली आहे. ही भरती विविध रेल्वे विभागांमध्ये केली जाईल. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच जाहीर केली जाईल.
पात्रतेसाठी, उमेदवाराने 10 वी परीक्षा उत्तीर्ण असावी लागेल. तसेच, उमेदवाराने मान्यताप्राप्त आयटीआयमधून इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असावा लागेल. उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे, आणि आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयामध्ये सवलत मिळेल.

अर्ज शुल्क:
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 500 रुपये
SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांसाठी: 250 रुपये
रेल्वे मंत्रालयाच्या पुढाकाराने सहाय्यक लोको पायलट पदांची नवीन भरती तरुणांसाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे. जे उमेदवार रेल्वेमध्ये भरती होण्याची प्रतीक्षा करत होते, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.
ईशान्य रेल्वेने महाकुंभमेळ्यादरम्यान 1700 विशेष गाड्या चालवल्या होत्या, ज्यामुळे लोको पायलट्सवर कामाचा दबाव वाढला होता. गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यामुळे लोको पायलटांना पुरेशी विश्रांती मिळत नव्हती, आणि सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे ही मोठ्या प्रमाणावर असिस्टंट लोको पायलट पदांची भरती जाहिर करण्यात आली आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati