रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI द्वारे कनिष्ठ अभियंता पदांसाठी भरती सुरु ; अर्ज करा !
RBI Recruitment 2025 : RBI अंतर्गत नोकरीची संधी आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज २० जानेवारी २०२५ पर्यंत करावेत .
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आपल्या मुंबई, चेन्नई, कोलकत्ता आणि दिल्ली रिजन अंतर्गत येणाऱ्या ४ झोन्समध्ये ज्युनियर इंजिनिअर (सिव्हील/इलेक्ट्रिकल) पदांसाठी भरती करणार आहे. एकूण रिक्त पदे ११ आहेत.
उमेदवारांसाठी पात्रतेच्या बाबतीत, दि. १ डिसेंबर २०२४ रोजी संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/ दिव्यांग – ५५ टक्के) आणि संबंधित कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असावा लागेल. तसेच, संबंधित विषयातील इंजिनीअरिंग पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज/दिव्यांग – ४५ टक्के) आणि संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव असावा लागेल.
ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) पदासाठी, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग पदविका/पदवीधारक उमेदवार देखील पात्र आहेत.
वयोमर्यादा: दि. १ डिसेंबर २०२४ रोजी २० ते ३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे; पुनर्विवाह न केलेल्या विधवा/घटस्फोटित/कायद्याने विभक्त महिला – ३५ वर्षे, अजा/अज – ४० वर्षे).
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० जानेवारी २०२५
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE