वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

IT सेक्टर मध्ये 2025 या वर्षी रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ !

IT सेक्टर मध्ये 2025 या वर्षी रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ !

Recruitment in IT Sector : IT सेक्टर अंतर्गत २०२५ या वर्षात रोजगार मिळण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.  गेल्या काही वर्षांत IT क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मोठी घट झाली होती, पण आता या क्षेत्रातील काम करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. NLB Services या टॅलेंट सोल्यूशन्स कंपनीच्या अहवालानुसार, 2024 च्या दुसऱ्या सहामाहीपासून सुरू झालेली सकारात्मकता 2025 पर्यंत अधिक गती घेईल आणि IT क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. म्हणजेच, 2025 मध्ये नोकऱ्यांची वाढ होईल.

IT Sector Recruitment 2025

रोजगार भरती 2025 मध्ये
अहवालानुसार, 2025 मध्ये IT क्षेत्रात 15 ते 20 टक्क्यांपर्यंत नव्या नोकऱ्या निर्माण होतील. यामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) सारख्या तंत्रज्ञान कौशल्यांसाठी 30 ते 35 टक्क्यांपर्यंत मागणी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांना अनेक रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.

AI आणि मशीन लर्निंगचा सुवर्णकाळ
गेल्या दोन वर्षांत AI, मशीन लर्निंग आणि क्लाऊड टेक्नोलॉजीज या क्षेत्रांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे, जरी नोकऱ्यांवर संकटाचा इशारा दिला जात असला तरी, या तंत्रज्ञानामुळे नवीन संधीही निर्माण झाल्या आहेत. AI आणि मशीन लर्निंगमध्ये पारंगत असलेल्या लोकांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढेल, असे मानले जात आहे.

फ्रेशर्ससाठी संधी
2025 हे वर्ष फ्रेशर्ससाठी खूप चांगले ठरणार आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या अवलंबामुळे नवीन कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीच्या संधींमध्ये वाढ होईल. कंपन्या केवळ भरतीच नाही, तर स्किल डेव्हलपमेंटवरही अधिक लक्ष देत आहेत. भारत हा IT क्षेत्रातील एक प्रमुख देश असून व्हाईट कॉलर जॉब्समध्ये भारताचे वर्चस्व आहे. काही काळासाठी IT क्षेत्रात मंदी आली होती, पण 2025 पर्यंत परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

GIPE पुणे – लेखा सहाय्यक पदभरतीची जाहिरात प्रकाशित

GIPE Pune AA Job 2025 - Gokhale Institute Of Politics & Economics, Pune invites Online applications in prescribed....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *