महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-अ संवर्गातील विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती मोहिमेंतर्गत विविध विभागांमध्ये पदे भरली जाणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २ जून २०२५ पासून आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर mpsc.gov.in जाऊन अर्ज भरावेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २३ जून २०२५ आहे.
या भरतीत खालील पदांचा समावेश आहे: औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील उप संचालक (५ पदे), पर्यावरण व वातावरणीय बदल विभागातील शास्त्रज्ञ, श्रेणी-२ (६ पदे), वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागातील सह संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन (१ पद) आणि दंत महाविद्यालयातील प्राध्यापक (१ पद) – हे सर्व पदे गट-अ संवर्गातील आहेत.

प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा यामध्ये फरक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावेत. आयोगाने भरतीसंबंधी सर्व तपशील सविस्तर दिले आहेत.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati