वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

खुशखबर, महाराष्ट्रातील रेशीम संचालयात १६५ पदांची भरती, त्यात १४४ गट मधील पदे!

महाराष्ट्र  सरकार साधीच विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरु करत आहे. या मुले भरतीची तयारी करत असलेल्या उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यातच एक अजून महत्वाच्या विभागाची भरती सुरु होणार असल्याची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र रेशीम संचालनालय, हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे डिपार्टमेंट आहे. या विभागात अनेक महत्वाचे पदे आहे जे शेतकीउद्योगाशी निगडित आहे.  यातच, या महाराष्ट्र रेशीम संचालनालयाकडून लवकरच 165 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे अशी बातमी समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे या १६५ पदांपैकी १४४ पदे हि ग्रुप डी ची आहे. म्हणजे १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.  तस तर सर्वच उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. विविध जिल्ह्यांमध्ये ही पदे उपलब्ध असून शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया यासंबंधी माहिती अधिकृत अधिसूचनेद्वारे दिली जाईल. या  बद्दलच्या पुढील माहितीसाठी आमच्या माझी नोकरीच्या व्हाट्सऍप ग्रुपला या लिंक वरून जॉईन व्हा.  

reshim sanchalanalay bharti

रेशीम संचालनालयाची माहिती आणि कामाचे स्वरूप – आपल्याला माहीतच असेल, रेशीम संचालनालय हे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत कार्यरत एक महत्त्वाचे संस्थान आहे. या संचालनालयाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील रेशीम उत्पादनाला चालना देणे, शेतकऱ्यांना रेशीम कीटक पालनाबाबत मार्गदर्शन करणे, रेशीम उद्योगासाठी लागणाऱ्या सुविधा पुरवणे आणि संशोधन व विकासामार्फत रेशीम क्षेत्रात सुधारणा करणे होय. हे संचालनालय शेतकऱ्यांना प्रशिक्षण, अनुदान योजना, कीटकांवरील नियंत्रण, रेशीम प्रक्रिया उद्योगासाठी मदत अशा विविध उपक्रमांद्वारे सेवा पुरवते. या विभाग नोकरी असले हे एक मोठं स्वाभिमानाचा प्रतीक आहे.

खालील पदांसाठी होणार भरती

या भरती प्रक्रियेमार्फत खालील पदांसाठी उमेदवारांची निवड होणार आहे –

  • सहायक रेशीम विकास अधिकारी
  • वरिष्ठ तंत्रज्ञ
  • तंत्रज्ञ
  • लिपिक
  • प्रयोगशाळा सहाय्यक
  • वाहनचालक
  • शिपाई

या सर्व पदांसाठी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा व इतर अटींची माहिती लवकरच प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत जाहिरातीत दिली जाईल. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

About MahaBharti MP Jobs

Check Also

State Drawing Exam 2025

State Drawing Exam च्या शुल्कात दुप्पट वाढ !

शालेय विद्यार्थ्यांच्या कलेला वाव मिळावा म्हणून मागील अनेक दशकांपासून आयोजित केली जाणारी शासकीय रेखाकला परीक्षा (State Drawing Examination) (एलिमेंटरी ग्रेड व इंटरमीजिएट ग्रेड) (Elementary Grade and Intermediate Grade) यासाठी शुल्क वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील आठ ते दहा लाख विद्यार्थी बसतात. मात्र, आता कला संचालनालयाने (Art Directorate) परीक्षा शुल्क वाढीच्या (Examination fee increase) घेतलेल्या निर्णयामुळे पालकांच्या खिशाला कात्री (Financial hardship for parents) लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *