पुण्यात २२ जुलै २०२५ ला ४ ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक उद्योजक सहभागी होणार आहेत. १०वी , १२वी , पदवीधर, आयटीआय, पदवीधारक आदी विविध पात्रताधारक उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. तरुणांसाठी नोकरी मिळविण्याची ही एक चांगली संधी आहे. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर किल्क करा.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार , उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व टीकाराम जगन्नाथ कॉलेज ऑफ आर्टस् , सायन्स अँड कॉमर्स , खडकी यांच्या मार्फत २२ जुलै रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयात ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. तसेच याच दिवशी प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, शिरुर, आळेफाटा (ता. जुन्नर) व अमेझ इंजिनिअर्स सोल्युशन, नाणेकरवाडी (ता. खेड) येथेही मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक उद्योजक सहभागी होणार असून १० वी, १२ वी, पदवीधर, आयटीआय, पदविकाधारक आदी विविध पात्रताधारक उमेदवारांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होणार आहेत. इच्छुकांनी विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन मेळाव्यातील रिक्त पदांसाठी अर्ज करावेत.
खाजगी क्षेत्रातील रिक्त पदांकरिता रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार आहेत. मुलाखतीस येताना आपल्या सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, पासपोर्ट साईज फोटो, आवश्यकतेनुसार अर्जाच्या (रेझ्यूमे) प्रती सोबत आणाव्यात, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे. तसेच प्रधानमंत्री कौशल्य केंद्र, शिरुर, आळेफाटा, ता. जुन्नर व अमेझ इंजिनिअर्स सोल्युशन, नाणेकरवाडी ता. खेड येथेही २२ जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नामांकित उद्योजक सहभागी होणार असल्याने, स्थानिक उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहेत.
नोकरीइच्छुक उमेदवारांना नवसह्याद्री एज्युकेशन सोसायटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पॉलीटेक्निक, नायगाव (नसरापूर ता. भोर), व शारदाबाई पवार इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, शारदानगर (ता. बारामती) येथे करिअर समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे उपक्रम मोफत असून जिल्ह्यातील जास्तीतजास्त उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात प्रत्यक्ष साधावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE