वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: रेल्वेने जाहीर केली बंपर भरती, जाणून घ्या !

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: रेल्वेने जाहीर केली बंपर भरती, जाणून घ्या !

RRB Recruitment 2025 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे! रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) मंत्रालयीन आणि स्वतंत्र पदांच्या भरतीसाठी 1,036 पदांची जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरती प्रक्रियेत रेल्वेच्या विविध विभागांमध्ये शिक्षण क्षेत्रातील पदे असणार आहेत. अर्ज प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2025 आहे. इच्छुक उमेदवार त्यांच्या प्रादेशिक RRB वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाईल. त्यात प्रमुख पदे अशी आहेत:

पदव्युत्तर शिक्षक (विविध विषय) – 187 पदे
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विविध विषय) – 338 पदे
प्राथमिक रेल्वे शिक्षक (विविध विषय) – 188 पदेRRB Bharti 2025
सायंटिफिक सुपरवायझर (एर्गोनॉमिक्स अँड ट्रेनिंग) – 3 पदे
चीफ लॉ असिस्टंट – 54 पदे
सरकारी वकील – 20 पदे
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (इंग्रजी माध्यम) – 18 पदे
सायंटिफिक असिस्टंट/ट्रेनिंग – 2 पदे
कनिष्ठ अनुवादक/हिंदी – 130 पदे
वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक – 3 पदे
कर्मचारी व कल्याण निरीक्षक – 59 पदे
ग्रंथपाल – 10 पदे
संगीत शिक्षक (महिला) – 3 पदे
सहायक शिक्षक, कनिष्ठ शाळा (महिला) – 2 पदे
लॅब असिस्टंट/स्कूल – 7 पदे
लॅब असिस्टंट ग्रेड 3 (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) – 12 पदे

अर्ज शुल्क:

जनरल, ओबीसी आणि EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹500
एससी/एसटी उमेदवारांसाठी ₹250

पगार:

पदव्युत्तर शिक्षक (विविध विषय) – ₹47,600
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (विविध विषय), सायंटिफिक सुपरवायझर, मुख्य विधी सहाय्यक, सरकारी वकील, शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक – ₹44,900
कनिष्ठ अनुवादक/हिंदी, वरिष्ठ प्रसिद्धी निरीक्षक, कर्मचारी व कल्याण निरीक्षक, ग्रंथपाल, संगीत शिक्षक (महिला), प्राथमिक रेल्वे शिक्षक (विविध विषय), सहाय्यक शिक्षक, कनिष्ठ शाळा (महिला) – ₹35,400
लॅब असिस्टंट/स्कूल – ₹25,500
लॅब असिस्टंट ग्रेड 3 (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) – ₹19,900

पात्रता निकष: सर्व पदांसाठी उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे असावी. प्रत्येक पदासाठी कमाल वयोमर्यादा वेगवेगळी आहे, ज्याबद्दल अधिक माहिती उमेदवार आरआरबीच्या अधिकृत अधिसूचनेतून पाहू शकतात.

तर, जर तुम्ही भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी गमावू इच्छित नसाल, तर 7 जानेवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि तुमचं अर्ज 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत सबमिट करा.

 

 

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

VSI पुणे – रु. ५०,०००/- दरमहा वेतन ; तांत्रिक अधिकारी – इंडस्ट्रिअल सेफ्टी अँड फायर पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

VSI Pune TO (ISF) Recruitment 2026 - Vasantdada Sugar Institute, Pune invites Online/Offline applications till last date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *