JOIN Telegram
Sunday , 30 March 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आनंदाची बातमी !! आरटीई’ प्रतीक्षायादीतील प्रवेशासाठी मुदतवाढ, प्रक्रिया ‘या’ तारखेपर्यंत चालू राहील.

RTE admission maharashtra 2025 : आरटीईच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेशाच्या प्रतीक्षायादीच्या पहिल्या टप्प्यांमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील ६२७शाळांमधील ११ हजार ३२२ जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १मधील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही, त्या बालकांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

RTE Admission process 2025

ठाणे जिल्ह्यातील २५ हजार ७७४ विद्यार्थ्यांचे अर्ज त्यासाठी आले आहेत. त्यापैकी १० हजार ४२९ विद्यार्थ्यांची आरटीई प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी केवळ ५ हजार ११३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. तर पहिल्या टप्प्यातील २ हजार ७०५ निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अद्यापही १ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांना प्रवेशासाठी आणखी वेळ मिळावा, याकरिता १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

प्रतिक्षा यादी टप्पा क्र. १मधील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतला नाही, त्या बालकांच्या पालकांनी अलोटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रे घेऊन मुदतीत नजिकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून आपले प्रवेश निश्चित करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *