वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

‘आरटीई’ प्रवेश: ६४ हजार बालकांना संधी!! – ‘RTE’ Admission: Opportunity for 64,000 Children!!

‘RTE’ Admission: Opportunity for 64,000 Children!! : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी यंदा राज्यभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. निवड यादीत तब्बल १,०१,९६७ बालकांना प्रवेश जाहीर झाला होता. मात्र, अंतिम मुदत संपेपर्यंत केवळ ६४,३७९ बालकांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत. आता प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होणार आहे.

RTE Admission

‘बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९’ अंतर्गत आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील ८,८६३ खासगी शाळांमध्ये एकूण १,०९,०८७ जागा उपलब्ध होत्या. यासाठी ३,०५,१५२ अर्ज आले होते. त्यापैकी १,०१,९६७ बालकांना निवड यादीत प्रवेश मिळाला. मात्र, शिक्षण विभागाने दिलेल्या अंतिम मुदतीनंतर ६४,३७९ बालकांचेच प्रवेश निश्चित झाले आहेत.

राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले की, निवड यादीतील बालकांच्या प्रवेशासाठी आता कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. अद्याप काही बालकांच्या प्रवेशाची नोंद पोर्टलवर अद्ययावत केली जात आहे. दरम्यान, प्रतीक्षा यादीतील बालकांसाठी प्रवेश प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होईल. त्यासाठी स्वतंत्र वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.

प्रवेश निश्चित झालेल्या बालकांची संख्या:

  • पुणे: ११,०९४ (एकूण जागा: १८,४९८)
  • ठाणे: ६,५४६ (एकूण जागा: ११,३२२)
  • छत्रपती संभाजीनगर: २,३०६ (एकूण जागा: ४,४०८)
  • नागपूर: ३,३६५ (एकूण जागा: ७,००५)
  • नाशिक: ३,२३६ (एकूण जागा: ५,२९६)

शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. तसेच पालकांनी आवश्यक कागदपत्रांसह लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

MACS – ARI पुणे – B.Sc/M.Sc (Life Sciences) ; रु. २०,०००/- दरमहा वेतनावर १ पदासाठी अर्जाची सूचना

ARI Pune PA Job 2025 - MACS - Agharkar Research Institute invites Online applications till last date 29/07/2025 & has arranged.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *