RTE Admission process for second waiting list begins on Monday : आरटीई प्रवेश प्रक्रिया: पहिल्या प्रतीक्षा यादीतील प्रवेशाची मुदत मंगळवारी संपली. त्यानंतर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने सोमवारी दुसऱ्या प्रतीक्षा यादीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती दिली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होती. यासाठी ८,८६३ शाळांमध्ये १,०९,१०२ जागा उपलब्ध होत्या, आणि त्यासाठी ३,०५,१५१ अर्ज प्राप्त झाले होते. सोडतीद्वारे १,०१,९६७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यानंतर १० मार्चपर्यंत ६९,६५९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरित जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश १८ मार्चपासून सुरू करण्यात आले होते, आणि २४ मार्चपर्यंत मुदत दिली होती. नंतर १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या प्रक्रियेत १२,२५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. यामुळे आता उर्वरित जागांसाठी दुसऱ्या प्रतीक्षा यादीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून सुरू होईल.
आरटीई प्रवेश प्रक्रियेत प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी साधारणतः चार फेऱ्या होणार आहेत. आतापर्यंत ८१,६८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. दरवर्षी साधारणपणे ८२,००० ते ८३,००० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतात. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया यावर्षीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE