RTMNU मध्ये कंत्राटी प्राध्यापकांची भरती होणार आहे. यासाठी एकूण रिक्त जागा ९२ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत ३५ हून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश होतो. बर्याच विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. या भरती संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल. तर खाली दिलेली आहे. ती माहिती सविस्तर वाचा
विशेष म्हणजे नियमित प्राध्यापकांपेक्षा कंत्राटी प्राध्यापकांची संख्या अधिक आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ९२ नियमित प्राध्यापकांच्या जागा भरण्यास मंजुरी दिली होती.

मात्र, या रिक्त जागा भरण्यात विद्यापीठ अपयशी ठरल्याने आता ९० पेक्षा अधिक कंत्राटी प्राध्यापकांची पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. नागपूर विद्यापीठात आता कंत्राटी प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
सध्या विद्यापीठात तासिका पद्धतीनुसार प्राध्यापकांना तासिकेनुसार वेतन मिळते. प्राध्यापक तासिका संपताच विभाग सोडून निघून जातात. त्यामुळे त्यांची विभाग आणि महाविद्यालयाप्रतीची जबाबदारी कमी होते. विद्यापीठात ९२ प्राध्यापकांची पदे मंजूर असतानाही भरती रखडली आहे. एलआयटी विद्यापीठापासून वेगळे झाल्याने प्राध्यापक भरतीसाठी आवश्यक असलेल्या बिंदुनामावलीचा प्रश्न निर्माण झाला. गेल्या वर्षभरापासून विद्यापीठाला नियमित प्राध्यापक भरती करता आलेली नाही. कंत्राटी प्राध्यापक भरण्याची वेळ आली आहे.
नवीन धोरणांतर्गत कंत्राटी प्राध्यापकांना पूर्णवेळ काम करावे लागेल. त्यांना सहायक प्राध्यापकांचा दर्जा दिला जाईल. यामुळे त्यांची विभाग आणि महाविद्यालयाप्रतीची जबाबदारी निश्चित होईल. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार, त्यांना प्रत्येक महिन्याला ४० हजार रुपये वेतन दिले जाईल. या उपायामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या कमतरतेची समस्या दूर होण्यास होईल आणि शैक्षणिक कार्यामध्ये अधिक सातत्य येईल अशी अपेक्षा आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati