पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घ्या.
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ‘ आणि ‘नमो शेतकरी महायोजना ‘ या दोन्ही योजनेचे हफ्ते एकाच दिवशी खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच एकदाच तुमच्या खात्यात ६००० रुपये येतील.

यासाठी काही गोष्टी पूर्ण करणे गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवायसी (KYC). जर तुमचं KYC पूर्ण नसेल, तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे जर अजूनही तुमचं KYC झालं नसेल, तर लवकरात लवकर तुमच्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन KYC पूर्ण करून घ्या.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात लागणारे बी, खत, औषधं आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर वस्तू खरेदी करता येतील. कारण सध्या पेरणीचा काळ सुरू आहे आणि पैशाची गरजही मोठी असते. हे पैसे शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त ठरणार आहेत. सरकारने हे हप्ते १८ जुलैच्या आसपास शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यभरात जवळपास ९३ लाख ५० हजार शेतकऱ्यांना या निर्णयाचा थेट फायदा मिळणार आहे. मात्र, केवळ पात्र शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळतील. पात्रतेसाठी तुमची सर्व कागदपत्रं योग्य असावीत आणि आधार, बँक खाते, केवायसी ही माहिती बरोबर जोडलेली असावी. ज्या शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नव्हते, त्यांचीही माहिती सरकारने तपासून ठेवली आहे.
आता त्यांच्या खात्यातही थकित हप्ते दिले जातील. यासाठी सरकारी कर्मचारी गावोगावी जाऊन कागदपत्र तपासत आहेत आणि तांत्रिक चुका सुधारत आहेत. पीएम किसान योजना म्हणजे काय? ही योजना केंद्र सरकारची असून, त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना दर वर्षी तीन समान हप्त्यांमध्ये एकूण ₹6000 रुपये दिले जातात.
हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. जर तुम्ही या दोन्ही योजनांचे लाभार्थी असाल आणि तुमचं KYC पूर्ण असेल, तर लवकरच तुमच्या खात्यात एकत्रित ₹4000 रुपये जमा होणार आहेत. हे पैसे पेरणीसाठी फारच उपयोगी पडतील. त्यामुळे खातं तपासा आणि अजून KYC बाकी असेल तर लगेच पूर्ण करा.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati