JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरची’ निर्मिती !

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरची’ निर्मिती !

Savitribai Phule Pune University News : पुणे विद्यापीठाने एका नामवंत उद्योग समुहाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय स्तराचे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी प्राथमिक स्तरावर चाचपणी केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शिक्षणसंस्था आणि उद्योगांमधील दरी दूर करण्यासाठी नामांकित उद्योगसमुहाच्या सहकार्याने इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी पावले उचलली असता, त्याला विद्यापीठातूनच अनावश्यक विरोध होताना दिसत आहे. या सेंटरच्या माध्यमातून विद्यापीठाला पदवी प्रदान समांरभ, आधुनिक प्रयोगशाळा, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या परिषदा, शैक्षणिक कार्यशाळा आणि प्रदर्शन, उद्योगांमधील बदलत्या ट्रेंडवर चर्चासत्रांना हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. ही हक्काची जागेची नामांकीत उद्योग समुहाकडून २०० कोटी रूपये खर्च करून निर्मिती होणार आहे. मात्र, अनाठायी विरोधामुळे विद्यार्थी, प्राध्यापक आणि उद्योजकांना एकत्र आणणारे सेंटर विद्यापीठाच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ‘इंडस्ट्री-अॅकॅडेमिया’ला महत्त्व देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना अधिकाधिक कौशल्याभिमुख शिक्षण उपलब्ध करून देत, त्यांना रोजगारासाठी आवश्यक शिक्षण द्यायचे आहे. हे करण्यासाठी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, महाविद्यालयांना खासगी उद्योग, आयटी कंपन्या, उत्पादक कंपन्या, लघु-मध्यम उद्योग, व्यवस्थापने आदींसोबतच काम करायचे आहे. त्याचप्रमाणे पायाभूत आणि शैक्षणिक सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी उद्योगांची मदत करण्याच्या सुचविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *