नोकरीची सुवर्णसंधी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 13 हजार 735 पदांसाठी भरती सुरु!
SBI Recruitment 2025 : SBI मध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये लिपिक पदांसाठी 13,000 हून अधिक जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होऊन उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 7 जानेवारी 2025 आहे.
जर तुम्ही सरकारी बँकांमध्ये नोकरीच्या तयारीत असाल, तर स्टेट बँक ऑफ इंडियाने लिपिक पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. यासाठी एकूण 13,735 पदे भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार एसबीआयमध्ये ज्युनिअर असोसिएट (कस्टमर सपोर्ट अँड सेल्स) पदासाठी अर्ज करू इच्छितात, ते एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात. नोंदणी प्रक्रिया 17 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली असून अर्जाची शेवटची तारीख 7 जानेवारी 2025 आहे.
महत्वाच्या तारखा:
अर्ज सुरू होण्याची तारीख: 17 डिसेंबर 2024
अर्जाची अंतिम तारीख: 7 जानेवारी 2025
मुख्य परीक्षेची तारीख: मार्च/एप्रिल 2025 मध्ये होण्याची शक्यता आहे.
शैक्षणिक पात्रता: एसबीआयमध्ये लिपिक पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री (आयडीडी) प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांनी 31 डिसेंबर 2024 पर्यंत किंवा त्यापूर्वी पदवी पूर्ण केली असल्याची खात्री करावी.
वयोमर्यादा: 1 एप्रिल 2024 रोजी उमेदवाराचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 एप्रिल 1996 पूर्वी आणि 1 एप्रिल 2004 नंतर झाला नसावा.
निवड प्रक्रिया: एसबीआय लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यात केली जाईल:
पूर्व परीक्षा
मुख्य परीक्षा
स्थानिक भाषेच्या चाचणी
पूर्व परीक्षा 100 गुणांचे वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असतील, आणि ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. या परीक्षेसाठी उमेदवारांना 1 तासाचा वेळ दिला जाईल.
अर्ज शुल्क:
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 750 रुपये आहे.
एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्सएस/डीएक्सएस उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट दिली आहे.
अर्ज शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून भरता येईल.
अर्ज कसा करावा: अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाऊ शकतात.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE